पिसि .जेसि .आणि आउट.
लेखनप्रकार
ह्या ष्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी माहिती.
पिसि म्हणजे पोलिस कस्टडी. जेसि म्हणजे ज्युडीशिअल कस्टडी. आउट म्हणजे जामिनावर सुटका.
आय .ओ.म्हणजे चौकशी अधिकारी. पो. नि. म्हणजे आयो शिवाय इतर पोलीस इन्स्पेक्टर.
बाकीची माहिती कथेच्या ओघात येईलंच. बँक फ्रॉड एखाद्या शेअर च्या इश्यु सारखा अंडरराईट होतो.अंडररायटर कोण हे फक्त फ्रॉड उघडकीला आला तरच कळतं कारण सेटलमेंट तोच करू शकतो.आयो सुध्दा सुरुवातीला ह्या प्रश्नाला हात घालत नाही. कारण त्याला तो कधीच पकडू शकत नाही.मॅटर कोणी वाजवली हे तपासाच्या अंतीम टप्प्यात कळतं.तो पर्यन्त आयोची तुंबडी भरलेली असते. एकदा केस बनली की त्याचं काम संपलं. पिसि संपली की आरोपी आणि आयो मित्र.
तपासाच्या दरम्यान सगळ्यांना अटक होते असं काही नाही . गुन्हा दाखल करण्यासाठी लॉजीकली ज्यांना ऍरेस्टकरायला पाहिजे त्यांनांच होते.बाकी बाजार बुणगे बाहेरचं राहतात.आता एवढंच पूरे. नाही तर फार कंटाळवाणं होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------
बारा जानेवारी २००२ ला संध्याकाळी साडेचार वाजता सरतेशेवटी मला अटक झाली. महिनाभर माझी आणि मेहता, मिश्रा यांची कसून चौकशी चालली होती. चार वाजता विरकर ऍडीशनल सि.पि .ला भेटून परत आले आणि आम्हाला बोलावलं.
देखो मेहता तेरेको पैला चांस.
एफडी रिसिट कौन बनाया?
मेरेकु नही मालूम. हू तो वरली मा छू.मेहेताचे वाक्य संपायच्या आत मेहेताच्या दोन्ही कानाखाली आवाज.
दोन मिंट शांतता. टायपिस्ट मध्येचं थांबले .मेन रोडच्या रहदारीचा आवाज.बाकीचे आयो बोलायचे थांबले.
दहा सेकंदानी मेहेताचा रडण्याचा आवाज. अमावस्येला कुत्रं रडत तशा भेसूर आवाजात.
(जोशी साब अपना नंबर है आज.मिश्रा माझ्या कानात कुजबुजला.)
मेहेता परत विरकर च्या समोर बसला.
महाडीक वाटंच पहात होता. त्यानी मेहेताच्या पाठीत एक जोरात रट्टा हाणला.
मेहेता दोन टेबलाच्या गॅप मध्ये.
विरकरनी पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर ओतला.
मेहेताचा आवाज अजून भेसूर झाला.
तो परत उठून खुर्चीवर बसणार तेवढ्यात विरकरनी खुर्ची वर लाथ मारली.
निचे बैठ गांडू.मेहेता जेमतेम त्या फटीत मावला.
विरकरनी एकदा कपाळावरचा घाम पुसला.महाडीकला सांगीतलं
पट्टा काढा महाडीक...
कपाटातून महाडीकनं पट्टा काढला.
(ये जीतना मार खायेगा उतना अपनेको कम पडेगा)
इसकी भैन आयी क्या आज?
नही साहेब.
फिर रहेने दे .
ती आल्यावर तिच्यासमोर मारतो साल्याला.
काय रावसाहेब , ऍडीशनल नी दिला काय आज?(बांबू)
समोरच्या टेबलवरून प्रधान साहेबांनी तेल घातलं.ही केस त्याला हवी होती खरं म्हणजे पण विरकर स्वताकडे केस मार्क करून घेण्यात हुशार.प्रधानला बार असोसिएशनची भुक्कड केस मिळाली होती.
बँक फ्रॉड मध्ये आरोपी गब्बर .थर्ड डीग्री जास्त वापरावी लागत नाही. आरोपी पेक्षा नातेवाईकांवर प्रेशर घालायचं. चारी बाजूनी कमाई.जोडीला एखादी नवी बाई.पण आर्थिक घोटाळे समजण्याची अक्कल पाहिजे.आणि अफरातफरीचे नेहेमीचे यशस्वी कलाकार माहिती हवेत.गणित साधंसोप असतंय.दोन तीन कारकूनांना मॅनेजर सोबत घेउन यायचं. त्यातल्यात्यात नाजूक जो दिसेल त्याला आधी फटकवायचा.मॅनेजरवर चार चौघात चढायचं.सहा सात तास बसवून ठेवायचं.घरून मोबाइलवर फोन यायला सुरुवात झाली कि फोन हिसकून आपणंच बोलायंच. तोपर्यंत सगळ्यांना मुतायला लागते. दुसर्या दिवशी बँकेच्या दोन बायकांना पंधरा विस मिनीटं या शो मध्ये बोलवायचं. तिसर्या दिवशी पासून कमाई चालू.पांढरपेशा समाजातले लोक वकीलाला घेउन येत नाहीत. कमीपणा समजतात.अडाणी आरोपीचा वकिल त्याच्या आधी पोलिस स्टेशनला येउन सेटींग लावतो.टॅरीफ ठरलेलं असतंय.महिन्याभराच्या सरावामुळे माझ्या घरून कोणी नाही आलं तरी चालणार होतं
माणसांची गरज अटक झाल्यावर लागते. आत केलेला पैसा तेव्हा कामाला येतो.थर्ड डीग्री पडत नाही. आत केलेला माल पचवता येतो. थोडीशी रिकव्हरी द्यावी लागते पण ठिक आहे . सिनीयर पासून सगळ्यांना बघाव लागतं . वो भी ठिक है. पुढच्या मॅटरचा इन्शुरन्स प्रिमीयम .आयो ची बदली झाली की आणखी एक एरिया आपला.
महिन्याभराच्या काळात सगळ्या युनीटची नाव पाठ झाली होती
---------------------------------------------------------------------------------------------------
त्या भय्याला घे रे आत .
(मेरा नंबर लगा जोशीसाब.)
मिश्रा उठला.हात जोडून विरकर समोर उभा राहिला.
थोबाडीत मारायची तर त्यांना जागेवरून उठावं लागेल असा उभा राहिला.
तू कल रात घर गया था?
हां साब .
*****किधर सोया था?
साब दहिसर गया था.
कौन से बार मे.
इस टेन्शन में क्या घर और क्या बार साब.(मॅटर फुटल्यानंतर मिश्रा घरी गेलाचं नव्हता.)
विरकर जागचा उठला.मिश्रा दोन पावलं मागे सरकला.महाडीक मागे उभाचं होता . त्यानी मिश्राला पुढे ढकललं. मिश्रा विरकरच्या
टप्प्यात आला. फाड्कन आवाज आला. मिश्रा भुईसपाट. ओठ फाटला. रक्त गळायला लागलं.बाहीला रक्त पुसत परत हात जोडून उभा राहीला.
आय**** चा बाप आज हेबिअस कॉर्पस फाइल करून आला.
ऍडीशनल सिपि चढला माझ्यावर आज.
आता विरकर कळवळायला लागला.खूप झालं जमा करा भ***ना.
इतका वेळ माझ्याकडे लक्ष नसलेलं आता पूर्ण माझ्याकडे फोकस झालं होतं.
भटा , तुझी आज वाजवतो.
मी काहीचं बोललो नाही. फक्त नाक दाबून उभा राहीलो. मिश्रा बाजूला उकिडवा बसला होता. तोही उभा राहीला.
साब , त्यानी मेहेताकडे बोट दाखवलं.
मेहेता मुताचा थारोळ्यात बसून होता.
पुढची दहा मिनीटं गतीमान हालचालीत गेली. थोरात मेहेताला बाथरूम मध्ये घेउन गेला.भयंकर ढगळ हाफ चड्डी घालून तो परत आला.
माधुरी , मेहेताची बहिण ठेपला ने चा घेउन आली. विरकर खूश होउन एसिपी साहेबांच्या केबीन मध्ये गेला.
मेहेता आणि मिश्रा दोघांची ऍरेस्ट मेमो रायटर लिहायला सुरुवात केली.
मिश्रा माझ्या बाजूला येउन बसला होता. अचानक खूश होउन म्हणाला
चलो जोशी साब मेरी छुट्टी शुरु.
एक बार पिसि हो गयी तो समझो मॅटर खतम .
ये साला अब और नही मार सकता. दो दो दिन बाद मेडिकल लिखानी पडेगी.
आपको लास्ट अंदर करेगा .
मै मेरा दे देगा. लेकीन आप जादा ढिल नही देना सालेको.
हां माधुरी को बोलना आज नही . कल.
मला सगळं सम़जलं.
आता फक्त पंधरा दिवस.
मी परत एकदा हसलो. विरकर समोर उभा होता.
(ही स्टोरी प्रयोगादाखल लिहीली आहे. पुढचा भाग जर लोकाग्रह दिसला तर. नाहीतर फिलम बदलू.)
,
वाचने
10576
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
थोड
In reply to थोड by झकासराव
समजू शकतो.
+१
माफ करा....
In reply to माफ करा.... by मन
परत प्रयत्न करतो.
विषय तसा अवघडच पण
बाप रे...
In reply to बाप रे... by भडकमकर मास्तर
पहिलटकरीण
In reply to पहिलटकरीण by रामदास
प्रयोगात वेळ लागतोच..
In reply to पहिलटकरीण by रामदास
वाचन
पूढील
मस्त लिहित