आधुनिक कृष्ण
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म
आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे
मातेची ममता अन् बापाचा धाक
पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक
दिवसा यशोदा अन् रात्री देवकी
वसुदेव की नंद सगळाच आनंद
रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग
सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग
ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी
जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी
वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी
कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी
संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी
कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी
जग एक बाजार बाजारात कृष्ण
'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न
यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई
देवकीला विसरुन कंसाचा होई
कंस आणि कृष्ण भेद काही होईना
कृष्णाला आरशातला कंस काही भ्याईना.
वाचन
2064
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
सॉलिड
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म