उल्कावर्षाव!
In reply to छान by श्रावण मोडक
In reply to छान by श्रावण मोडक
In reply to छान by श्रावण मोडक
अर्थात अश्या विविधतेसाठी वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तुमानाच्या उल्का हव्यात आणि कमीतकमी प्रकाशमात्रा असलेली मोकळी जागा हवी.कमीतकमी प्रकाशमात्रा म्हणजे भरपूर अंधार का? (ह. घे.)
In reply to सोप्या भाषेत छान माहिती by राजेश घासकडवी
In reply to सोप्या भाषेत छान माहिती by राजेश घासकडवी
In reply to सोप्या भाषेत छान माहिती by राजेश घासकडवी
In reply to माझ्या अल्पमतीप्रमाणे उत्तरे by असुर
'ब्रूस विलीस' नावाच्या अशनीसारख्या दिसणार्या एका टोण्याने त्यात काम केलंय.:D बाकी लेख छानच.
In reply to विनंतीला मान देऊन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती तै, by असुर
In reply to लेख वाचनिय आहे...छान माहीती by शिल्पा ब
In reply to असुरराज हे लेखन देखील by परिकथेतील राजकुमार
In reply to असुर तुझा लेख उत्तम माहितीपूर्ण आहे! by चतुरंग
In reply to ओरीनीड्स आणि लेओनीड्स by असुर
In reply to आपल्या निरीक्षणाच्या ठिकाणाप्रमाणे हे तारकासमूह वेगळे दिसतात by Arun Powar
In reply to आवडला. by ऋषिकेश
In reply to तारा कधीही तुटत नाही. तो by Pain
जर त्याचे केंद्र आकुंचन पावत गेले तर कृष्णविवर तयार होते, ही माहिती बरोबर आहे का ?तारा मरायला येतो (केंद्रात ऊर्जा बनणं कमी कमी होत संपतं) तोपर्यंत बाहेरचे थर खूप प्रसरण पावले असतात आणि केंद्र आकुंचन पावत असतं. अशा स्थितीत तार्याच्या पृष्ठभागाचं तापमान बरंच कमी झालेलं असतं म्हणून रंग लाल होत जातो. या स्थितीचं वर्णन राक्षसी रक्तवर्णी असं करता येईल. सध्या आकाशात काक्षी (मृग), स्वाती, antares (वृश्चिक), eta karinae हे तारे असेच आहेत. सूर्याचा आकार मंगळाच्या कक्षेपर्यंत असेल आणि ग्रहमाला वाचली असेल तर त्यांच्याही कक्षा कदाचित मोठ्या झाल्या असतील आणि बुध-शुक्र-पृथ्वी सूर्याने गिळून टाकले असतील. तार्याचं केंद्र आकुंचित होत जातं आणि जास्तीत जास्त लोखंडापर्यंत जड मूलद्रव्य बनून ऊर्जा निर्मिती थांबते. यापुढे अणूकेंद्र एकत्र येऊन ऊर्जा निर्मीती होऊ शकत नाही. गुरूत्वाकर्षण भारी पडतं आणि केंद्राचं आकुंचन सुरू होतं. आकुंचन थांबू शकतं ते electron degeneracy pressure मुळे. एका अणूच्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखी असू शकत नाही - हे तत्त्व पॉलीचे exclusion principle म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुरूत्त्वाकर्षणाच्या दाबामुळे जेव्हा एका अणूतल्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखीच होऊ पहाते त्याला इलेक्ट्रॉन विरोध करतात हेच ते degeneracy pressure! जर या degeneracy pressure ने गुरूत्वाकर्षणाला तोलून धरलं तर तार्याचा होतो श्वेतबटू / पांढरा खुजा / white dwarf! (सूर्याचं मरण असंच असेल.) पण जर गुरूत्वाकर्षण degeneracy pressure ला भारी पडलं तर मग इलेक्ट्रॉन्स अणूच्या केंद्रकाशी धडकू लागतात आणि शेवटी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स एकत्र येऊन न्यूट्रॉन्स तयार होतात. तार्याच्या केंद्राचं वस्तूमान सूर्याच्या एकूण वस्तूमानाच्या १.४ पटीपेक्षा जास्त असेल तरच अशा पद्धतीने न्यूट्रॉन्स तयार होऊ शकतात. हा आकडा शोधून काढला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी! (याच संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला.) पुन्हा एकदा न्यूट्रॉन degeneracy pressure गुरूत्वाकर्षणाला रोखून धरतं. न्यूट्रॉन तार्यापैकीच काही पल्सार्सच्या स्वरूपात दिसतात. यातही तार्याचं वस्तूमान जास्त असेल तर तार्याच्या आतल्या बाजूला होणार्या पडझडीमुळे केंद्रात स्फोट होतो ज्याला अतिनवतारा किंवा supernova म्हणतात. यातही स्फोटानंतर तार्याचं वस्तूमान सूर्याच्या एकूण वस्तूमानाच्या १.४ पटीपेक्षा कमी असेल तर तार्याचा श्वेतबटू होतो, जास्त असेल तर न्यूट्रॉन तारा. आणि जर तार्याचं केंद्र आणखी जास्त जड असेल तर न्यूट्रॉन degeneracy pressure ही गुरूत्वाकर्षणाला रोखून धरू शकत नाही आणि मग तार्यांचं कृष्णविवर तयार होतं. न्यूट्रॉन तारा आणि कृष्णविवर होण्यासाठी तार्याचं वस्तूमान किती असायला हवं याचं नेमकं उत्तर आज माहित नाही. कारण कृष्णविवराच्या आत पदार्थाची स्थिती काय असते हे अजून आपल्याला माहित नाही. आता माझी टैम्प्लिस! असुर पुढची गोष्ट सांगेल! ;-)
In reply to थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करते by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करते by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती by Pain
आपल्या सूर्यात हायडोजनचे अणू एकत्र येउन हेलियमचा अणू बनण्याची प्रक्रिया (fusion reaction) सुरु असते. मोठे अणू म्हणजे फार तर म्हणजे बेरिलियम, लिथियम पर्यंत. त्या तुलनेत लो़खंडाचा अणू खूपच मोठा आहे.अगदी बरोबर. तार्याच्या जीवनक्रमातला जिवंतपणीचा बराचसा काळ तारा हायड्रोजनचं हेलियममधे रूपांतर करतो आणि त्यात जी वस्तूमानाची घट येते ती ऊर्जेत रूपांतरीत होते. (आईनस्टाईनचं समीकरण: E=m×c×c) जेव्हा केंद्रातला हायड्रोजन संपत येतो तेव्हा हेलियमचं लिथियम (अणूक्रमांक* ३), बेरियम (अणूक्रमांक ४) अशा पद्धतीने रूपांतर व्हायला सुरूवात होते. हलक्या किंवा अणूक्रमांक कमी असलेल्या अणूंची केंद्रकं एकत्र येऊन (nuclear fusion) जड अणूंची केंद्रकं तयार होतात. या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडण्याची क्रिया (exothermic) फक्त लोखंडाचं केंद्र (अणूक्रमांक २६) बनेपर्यंतच होते. पुढची जड मूलद्रव्य (उदा: कोबॉल्ट, निकल, तांबं, सोनं, चांदी, युरेनियम, इ.) बनवण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी (endothermic) लागते. त्यामुळे तार्याच्या अंतर्भागात लोखंडाचा गाभा बनला की पुढची ऊर्जा अणूकेंद्रकं एकत्र येऊन मिळवता येत नाही. सूर्याच्या बाबतीत, सूर्याचं वस्तूमान बरंच कमी असल्यामुळे केंद्रकात कार्बन (अणूक्रमांक ६) पर्यंतच जड मूलद्रव्य बनू शकतील. त्यापुढची मूलद्रव्य बनण्याच्या आधीच सूर्याचा "मृत्यु" होईल.
येथे उर्जा म्हणजे नक्की कुठली उर्जा अपे़क्षित आहे ? १) त्यांच्यावरचा ऋण भार (negative charge) समान असतो. २) अणूची रचना आपल्या सूर्यमालेप्रमाणे धरल्यास त्यांची गुरुत्त्वाकर्षणामुळे असलेली ( F=Gm1m2/r*r) स्थितीज उर्जा (potential energy) ही प्रत्येक इलेक्ट्रॉनची समान असणार:एका अणूचा विचार करता ... (हायड्रोजनचा विचार करू कारण तो सगळ्यात साधा अणू आहे) ... इलेक्ट्रॉन अणूकेंद्राभोवती फिरतो त्यामुळे त्यावर विविध बलं काम करत असतातः पैकी सगळ्यात जे अशक्त बल, गुरूत्वाकर्षण त्याचा तुम्ही उल्लेख केला आहेच. पण गुरूत्वाकर्षण इतर दोन बलांपेक्षा एवढं कमी असतं की त्याचा विचार करण्यात फारसा अर्थ नाही. अणूकेंद्राचा धनभार आणि इलेक्ट्रॉनचा ऋणभार यांच्यातही आकर्षण असतं ते दुसरं बल झालं. यामुळे इलेक्ट्रॉनला स्थितीक उर्जा (potential energy) असते. १. इलेक्ट्रॉन एका "ठराविक आकारा"च्या कक्षेत (shell) अणूकेंद्रकाभोवती फिरत असतो. (हे खरंतर अर्धसत्य आहे, पण ते प्रश्न असल्यास सविस्तर नंतर लिहेन.) २. शिवाय या एका कक्षेत उपकक्षा (subshell) असतात. क्वांटम थिअरीप्रमाणे या प्रत्येक कक्षा आणि उपकक्षेसाठी ठराविक उर्जा असते त्याहून निराळी उर्जा इलेक्ट्रॉनकडे असू शकत नाही. किंवा प्रत्येक कक्षा आणि उपकक्षेसाठी क्वांटम नंबर्स असतात. किंवा एका ठराविक एककाच्या पटीतच इलेक्ट्रॉनची उर्जा असू शकते. उदा: ए हे एकक ठरवलं, तर इलेक्ट्रॉनची उर्जा १×ए, २×ए, ३×ए ... एवढीच असू शकते. ३. या उपकक्षेचा आकार गोलाकार असतोच असं नाही. तेव्हा उपकक्षेच्या ओरिएंटेशन (मराठी शब्द?) प्रमाणे इलेक्ट्रॉनची उर्जा बदलू शकते. ४. शेवटी, इलेक्ट्रॉन स्वतःभोवती 'स्पिन' होतो. या स्पिनमधेही इलेक्ट्रॉनची उर्जा साठवलेली असते. आणि इथेही उर्जेचं क्वांटायझेशन होतं. या चार प्रकारच्या क्वांटम नंबर्समुळे एका अणू केंद्रकासाठी इलेक्ट्रॉनसाठी ठराविक कक्षा, उपकक्षा इ. असू शकतात. बाहेरून बलप्रयोग न झाल्यास यातल्या अनेक उर्जास्थिती इलेक्ट्रॉनसाठी उपलब्ध असतात. पण जेव्हा श्वेत बटू स्थिती येते तेव्हा बाहेरून गुरूत्वाकर्षण इलेक्ट्रॉन्सना अणूकेंद्राकडे ढकलू लागतं तेव्हा मात्र इलेक्ट्रॉन्सच्या गर्दीत 'पॉलीचे एक्सक्लूजन प्रिन्सीपल', किंवा एका सिस्टममधे एका उर्जास्थितीसाठी एक इलेक्ट्रॉन या न्यायाने इलेक्ट्रॉन्सचा दाब (डिजनरसी प्रेशर) गुरूत्वाकर्षणाला रोखू शकतं. *अणूक्रमांक = अणूकेंद्रात असणार्या प्रोटॉन्सची संख्या (हे सगळं मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही अगम्य भाषेत, अगम्य विज्ञान लिहीलेलं आहे अशी मलाच शंका येते आहे.)
छान