मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लव फळ

जागु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जसे राम फळ, सीता फळ तसे हे लव फळ. हे मोठे झाड होते. ह्याची पाने रुंद मोठी असतात. लव फळ कच्चे असताना हिरवेगार साधारण पोपटी असे असते. मग पिकत गेल की पिवळसर रंग चढतो. आणि पिकले की एकदम गर्द नारंगी कलर (पिकलेल्या पपई सारखा) येतो. ह्याचे साल चरट अगदी पातळ असते. ह्यात गरा पेक्षा बियाच जास्त असतात त्या पांढर्‍या असतात. चविला हे फळ आंबट गोड असते. ह्याच्या बियांमुळे हे फळ खायच म्हणजे टाइमपास असतो. बराच वेळ बिया तोंडातच काढत खात बसायला लागते. कारण ह्याचा गर सिताफळाप्रमाणेच बीला चिकटलेला असतो. पण अगदी चिवटपणे. हे झाड माझ्या माहेरी अगदी आमच्या माळ्याच्या जिन्याच्या समोर आहे. शाळेत असताना मी सकाळी, संध्याकाळी जिन्यावर अभ्यास करत असे. त्यावेळी ह्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ही फळे खाण्यासाठी येत. त्यात पोपट, चिमण्या, सुगरण, कोकीळा, कावळे, पोपटी रंगाचे पण चिमण्यांएवढे पक्षीही येत. ते दृष्य अगदी बघतच रहावेसे वाटे. झाडाला भरपुर फळे यायची. आम्ही काढून ती पक्षांनापण उरायची. कारण हे फळ जास्त परिचित नसल्याने इतर लोकांकडून ह्या फळासाठी डिमांड येत नसे. पण ज्यांना ह्याची चव कळ्ली आणि ज्यांना आंबट गोड वर्गातील फळे आवडता आणि जे हे फळ खाण्यासाठी वेळ देउ शकतात ते मात्र घेउन जायचे. माझ्याही लव फळ हे आवडीचे फळ आहे. मी ह्या फळाचा पाव भाग १५ मिनीटेतरी साधारण खात बसायचे. पण मला ह्याची चव खुप आवडायची. आता ह्या झाडाला पुर्वी सारखी फळे धरत नाहित. पण मागच्या आठवड्यात माहेरी गेले तेंव्हा अचानक नजर गेली लागलेल्या फळावर आणि तुमच्याबरोबर हे झाड, फळ शेअर कराव म्हणुन खालील फोटो तुम्हाला दाखवायला काढले. हे हिरवे कच्चे फळ हे पिकत आलेले फळ पण पुर्ण पिकलेले नाही. पिकल्यावर एकदम ऑरेंज कलर होतो.

वाचने 7543 वाचनखूण प्रतिक्रिया 22

येडबंबू गुरुवार, 08/12/2010 - 15:20
मला वाटले प्रेमात काय काय फळे भोगावी लागतात ते सांगताय :) छान लेख. ---

सूड गुरुवार, 08/12/2010 - 16:06
मला पण येडबंबू सारखंच काहीसं वाटलं आधी, पण नवीन फळाची माहिती मिळाली.....( थोडं विषयांतर आहे, पण कुणी सांगेल का की लिखाणात स्मायली कसे अ‍ॅड करतात ?? मी नवीन आहे ईथे ....)

भाऊ पाटील गुरुवार, 08/12/2010 - 19:04
फोटो दिसत नाहीत :( बाकी लव फळ पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे फोटॉ बघण्याची जास्त उत्सुकता आहे. याचे इंग्लिश नाव सांगता का? म्हणजे गूगलवर फोटो पाहता येतील.

In reply to by भाऊ पाटील

जागु Fri, 08/13/2010 - 12:39
ह्याचे इंग्लिश नाव मलाही माहीत नाही. परत माहेरी गेले आणि हे फळ आले असले की मी ते फळ काढायला सांगुन त्या फळाचा फोटो टाकेन.

सुनील Fri, 08/13/2010 - 00:13
हे फळ आणि फळाचे नाव प्रथमच ऐकले. सचित्र माहितीबद्दल धन्यवाद. ह्याल लव फळ असे नाव कसे पडले? माझ्या मते, "लव" फळ हे नाव धारण करण्याचा अधिकार फक्त सफरचंदालाच आहे!

रुपी Fri, 08/13/2010 - 02:48
फोटोयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! केरळमध्ये बर्‍याच मसाल्याच्या बागा पाहता येतात. त्यामध्ये आम्हाला एक झाड दाखवले होते, हनुमान फळाचे. पण, खूप दिवस झाले त्याला. माझ्याकडे फोटोही नाहीत, आणि मला ते दिसायला कसे होते हेही आठवत नाही. कुणास ठाउक, कदाचित याच झाडाला तिकडे हनुमान फळ म्हणत असतील!