धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
लेखनप्रकार
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
माझं असं दणक्यात स्वागत झालेलं बघून मनातून खुश झालो होतोच, तो कार्यकर्ता इतक्या निरागस चेहेऱ्याने बघत होता की त्याला समजावून काय सांगणार कप्पाळ. तो मला हौसेने त्याच्या पिकअप वॅगन मध्ये बसवून युनिवर्सिटी मध्ये घेऊन आला.
पहिल्या नजरेतच गारद झालो. दीडशे एकराचा हिरवागार कॅम्पस, घनदाट झाडी, मधे मधे डोकावानार्या छोट्या इमारती, झाडीतून वळणं वळणं घेऊन जाणारे रस्ते. कॉलेज तरुण तरुणींचे हसतखिदळत आपल्याच धुंदीत जाणारे थवे. सगळं अगदी स्वप्नांतल्यासारखं. माझी राहण्याची सोय युनिवर्सिटीच्या रिसर्च फ्लॅट मधे केलीये अशी बातमी लागली. किल्लीने दार उघडून आत पाउल ठेवलं आणि स्वप्न मोडलं.
अगदी रानात असावं तसं एक कॉटेज, म्हणजे काय, रानातच होतं म्हणा ते, आजूबाजूला किर्र झाडी. खायचे प्यायचे वांदे. माझा चालक मला सोडून निघून गेलेला, स्थानिक मालकिणीला मी इंग्रजीशी थोडी झटापट करून माझे ‘छत्रपती’पण पटवायचा प्रयत्न केला, एकंदरीत संवाद येणेप्रमाणे.
मी – प्यायचं पाणी मिळेल का?
मालकीणबाई – हो, किचनच्या नळाला आहे ते प्यायचंच आहे. (ती जे इंग्रजी बोलली त्याचा असं अर्थ मी काढला, वेगळा अर्थ असल्यास कळायला मार्ग नाही )
मी – ठीकाय, पण काही त्रास नाही नं होणार?
मालकीणबाई – काय माहित, आम्ही पीत नाही ते. आम्ही बाटलीबंदच पितो.
मी – मग ते कुठे मिळेल?
मालकीणबाई – इथे काही अंतरावर युनिवर्सिटीच्या कॅटीनमधे मिळेल.
मी – ठीक आहे , चालू असेल नं ते आता?
मालकीणबाई – नाही, बंद झालं ते आता.
मी – आता हो !!
मालकीणबाई - उद्या मिळेल पण तुम्हाला नक्की.
मी – आणि ए. सी. चालू नाहीये..
मालकीणबाई – पंखा चालू आहे.
मी – संडासाचे दार लागत नाहीये.
मालकीणबाई – हो.
मी अधिकचा संवाद टाळला, प्रवास बराच झाला होता. परक्या देशात स्त्रीहत्येचं पातक कशाला डोक्यावर म्हणून सोडून दिलं. हताश चेहेर्यानं रूमवर येऊन. थोडसं फरसाण खाल्लं. विमानतळावर एक कोकची बाटली घेतली होती ती अगदी शेवटच्या थेंबापर्यंत चवीचवीने संपवली आणि झोपलो.
कितीतरी वेळ झोप लागत नव्हती, किर्र झाडी अंगावर येत होती, कितीतरी वर्षांनी मी जंगलाचा आवाज एवढ्या निवांतपणे ऐकत होतो. एवढ्या शांततेत स्वतःलाच सामोरं जाणही खूप अवघड असतं बुवा.
आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात. त्यापैकी ती एक.... असो.
दुसऱ्याच दिवशी प्रवचन होतं, लवकरच जाग आली, थोडा बाहेर आलो फेरफटका मारायला तर, सगळ्या आसमंतानं एकदम रूपच पालटलं होतं. की मलाच रात्रीच्या त्या खोल, खडसावानार्या स्वसंवादामुळे नवी उत्तरं मिळत होती. कोवळं उन पांघरून, सगळं रान बेटं मोठ्या साळसूदपणे उभं होतं.
मस्त ताजी पहाट, पक्ष्यांचा किलबिलाटात, एवढ्या वृक्षांच्या समवेत बघायची म्हणजे, त्याला आमचं निबर मन काय कामाचं, त्याला बालकवींची किंवा बोराकारांची हळूवार, तरल प्रतिभाच काहीतरी न्याय देऊ शकेल. मी कितीतरी वेळ शांतपणे एकटाच घोटाघोटाने ती अप्रतीम सोनपहाट पीत होतो.
आपण ह्याच केम्पस मधे राहणार असू तर रोज इथे असेपर्यंत ही पहाट पहायचीच असा तेव्हाच मनोमन निश्चय केला.
बाकी काही बघायला वेळच नाही मिळाला आज, सरळ प्रवचन चालू केलं. आमच्या शिष्यगणाचा एक फटू तेवढा काढलाय हा घ्या
क्रमशः
वाचने
11496
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
हाही भाग मस्तच फक्त थोडे मोठे
In reply to हाही भाग मस्तच फक्त थोडे मोठे by प्रभो
सहमत....छानंच लिहिलंय.
छान
In reply to छान by सुनील
सहमत
In reply to सहमत by प्रियाली
+१
सरळ प्रवचन चालू केलं. त्ये
दणदणीत!!! अर्धवटराव,
खल्लास!
In reply to खल्लास! by धमाल मुलगा
खर्रं खर्रं!!!
In reply to खर्रं खर्रं!!! by मस्त कलंदर
+२
In reply to खल्लास! by धमाल मुलगा
+१
१ ल्मबर हो
छान लेखन
In reply to छान लेखन by राजेश घासकडवी
राघांशी सहमत आहे. ही लेखमाला
दोन्ही भाग वाचले; आवडले
मस्त!
वाचते आहे!
मस्तच . पुढचा भाग पटकन
In reply to मस्तच . पुढचा भाग पटकन by पुष्करिणी
आज पुढचा भाग येणार ना? तसं
छान
वाचत आहे.
छानच
छानच लिहिताय. जरा मोठे भाग
मस्त!
In reply to मस्त! by सहज
+१
हा भाग
अहा,
मस्तच.
दे धमाल!
लेख सुंदर. फोटो तर त्याहुन
वाचतोय!
फक्कड !!
जबरदस्त अनुभवलेखन. लवकर लिहीत
अर्धवटराव तुम्ही फार सुंदर
छान
मस्त लिखान..