रानभाजी - १५) शेवग्याचा पाला
शेवग्याचा पाला
लागणारे साहित्य:
शेवग्याचा पाला
२ मोठे कांदे
२-३ मिरच्या
३-४ पाकळ्या लसुण
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
३-४ खवलेल चमचे ओल खोबर
चविपुरते मिठ
चिमुटभर साखर
तेल
पाककृती:
प्रथम शेवग्याचा पाला काढुन धुवुन चिरुन घ्यावा. मग तव्यावर थोडा भाजावा. आता तेलावर लसुण टाकुन मिरची, कांदा, हिंग, हळद घालावे वरुन शेवग्याचा भाजलेला पाला घालावा परतुन थोडा वेळ शिजवावा. भाजलेला असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते. मग मिठ, साखर, खोबर घालून थोड परतवुन गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
*आमच्याइथे हा पाला भाजून घेण्याची पद्धत आहे. पण न भाजताही मी भाजी केली आहे. ती भाजलेल्या पानाएवढी टेस्टी नाही लागली. कदाचित ह्या भाजीतील जडपणा जाण्यासाठी पाला भाजुन घेत असतील.
*इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.
*शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.
*ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.
*बाळाच्या पाचविला ही भाजी सटवाईला नेवेद्य म्हणून पानावर दाखवुन ते नेवेद्य बाळाच्या आईने खाण्याची पद्धत आहे.
*बाळंतीणीसाठीही ही भाजी पोषक असते.
वाचने
8799
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
मला वरती परत संपादन करता येत
भाजी शॉल्लेड डेंजर दिसत आहे
In reply to भाजी शॉल्लेड डेंजर दिसत आहे by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे..
भजी खाल्ली आहे, भाजी नाही
मस्त...
जागुतै, मस्त गं! तयार भाजीचा
जागुतै,
मस्त
रेसिपी छान आहे