मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेसीपी हवी आहे... रबडी / बासुंदी

जाई अस्सल कोल्हापुरी · · पाककृती
दिर्घकाळ टिकाऊ दुधा (long life milk) पासुन किंवा टिनबंद आटिव दुधापासुन (condenced milk) बासुंदी बनवता येते का? कशी बनवायची?

वाचने 8999 वाचनखूण प्रतिक्रिया 9

अवलिया गुरुवार, 07/29/2010 - 15:34
मला माहित आहे. पण एका ओळीच्या असल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देउ नये असे अभिजनांचे मत आहे आणि अशा त-हेच्या पृच्छा एका ओळीत न करता कशा केल्या म्हणजे प्रतिक्रिया देणे योग्य असते याचा खुलासा अभिजनांनी अजुन न केल्याने प्रतिसाद देउ शकत नाही. (बहुजन)

In reply to by अवलिया

शुचि गुरुवार, 07/29/2010 - 18:46
सुरुवातीला भरपूर अवांतर लिहून - जसं गोडधोड कोणाला आवडत नाही अगदी साक्षात देव गणपती मोदकप्रिय समजला जातो वगैरे वगैरे पाल्हाळ लावलं मग ते कितीही "टॅकी" असेना.... की काही लोकांना मजा येते निदान त्यांचा टाईमपास होतो वर टीका करायला मिळते ते वेगळच. असं पाल्हाळ लावून शेवटी आपला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा. मग बर्‍याच जणांना वाटतं की अरे हा तर १२ ओळींचा धागा झाला. अरे हो- नव्या लाईनीवर नवी ओळ टाका.

अप्पा जोगळेकर Fri, 07/30/2010 - 09:53
दूध पावडर्चा उपयोग केला तर बासुंदी सही होते. ती सर मिल्क्मेड पासून बनवलेल्या बासुंदीला नाही. फक्त प्रमाण मात्र अगदी बिनचूक असावे लागते. आणि दूध आटवून जर बासुंदी करायची असेल तर मग ४-५ तास गेलेच म्हणून समजा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

.... आपल्या चितळ्यांची दुबईस शाखा वगैरे असेल तर तोहि पत्ता कळवा....! .... आधीच दु:खात असलेल्या आम्हाला असे चितळयांची आठवण करुन देउन हिणवण्यात काय समाधान मिळाले तुम्हास?

गमत्या Tue, 08/03/2010 - 02:59
बुर्ज खलीफा च्या उजव्या गल्ली च्या दुसर्‍या टोकाशी. दुबई - उनायटेड अरब अमीरात. कृपया : बासुंदी ध्यायला येताना न विसरता आपला डब्बा धेउन जाने अन्यथा अपमान केला जाईल व बासुंदी मिळणार नाही.