अरूपाचे रूप
लेखनविषय:
काव्यरस
अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई
भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत
दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग
भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात
मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन
वाचने
3832
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त!
मस्त अभंग..
सु & स
In reply to सु & स by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by केशवसुमार
हेच
अभंग
चांगला
अभंग चालीत
व्वा...!
In reply to व्वा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाशन
खूप सुन्दर!!!
खुपच
अप्रतिम!!! स
सुंदर