प्रकटन
लेखनप्रकार
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले.
अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले.
तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे. माझे भाग्यश्रीशी बोलणे झाले त्यानुसार या मुलीने धीर राखला आहे.
हा मजकूर जनातलं, मनातलं या सदराखाली टाकताना श्र्वास अडकला.
वाचने
30634
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
छे! काय लिहू?....
(सुन्न)चतुरंग
खिन्न.
In reply to . by सहज
सकाळी सकाळी मिपा उघडल आणि ही धक्कादायक बातमी. :(
काय बोलू.
फार वाईट झाले.
In reply to स्स्स्स्स्स्स्स by महेश हतोळकर
वाईट वाटले.
परिवारच हा.
अरे बापरे!!! खुप वाईट वाटलं वाचुन...भाग्यश्रीला सगळं सहन करण्याची शक्ति मिळो.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आत्ताच ही बातमी समजली, सकाळवरही वाचले.
वाईट झाले, फार वाईट झाले.
अभिनय आमचा मित्र होता, सहप्रवासी होता, व्यासंगी आणि धडपड्या सदस्य होता आणि खुप चांगला माणुस होता.
काहीच दिवसापुर्वी त्याच्याशी चॅटवर बोलायचे म्हणुन मनात आले होते.
पुढच्या काही दिवसात कामानिमित्त इंदुर दौर्यात त्याला भेटायचेही ठरवले होते.
गेली ती वेळ निघुन, गेलीच निघुन ...
फार फार वाईट झाले !
>>माझे भाग्यश्रीशी बोलणे झाले त्यानुसार या मुलीने धीर राखला आहे.
परमेश्वर कुलकर्णी परिवाराला, त्यांच्या आप्त व दोस्तमंडळींना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
------
छोटा डॉन
:(
:(
अतिशय वाइट बातमी.
वाचतानाही श्वास अडकला.
हॉरिबल .....................................
डेंजरस ..
परवा दिवशीच बोललो होतो मी त्याच्याशी ???????????????????..
खिन्न आणि सुन्न ..
धक्कादायक..
अत्ताच सकाळ मध्ये ही बातमी वाचली.. पण हेच आपले सहप्रवासी, सदस्य भोचक माहिती नव्हते.. अत्यंत दु:खद घटना..
!
क्लेशदायक. अभिनयच्या आप्तांना हे दु:ख पेलवण्याचे परमेश्वर सामर्थ्य देवो. माझ्या सहवेदना.
बापरे. खुप धक्कादायक बातमी! :( वाचुन फार वाईट वाटले!
-Nile
काय प्रतिक्रिया लिहावी ते सुचत नाही...
In reply to ... by नंदन
नंदनशी सहमत..
मानवी बुद्धी काम करेनाशी होते अश्या काही घटना असतात..
मिपाची तर झालीच आहे परंतु माझीही व्यक्तिगत हानी झाली आहे.. एक चांगला सुहृद आयुष्यभराकरता हरवून बसलो आहे..
तात्या.
-- Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
देव त्यांच्या व इतर मृतात्म्यांस शान्ति देवो हीच इश्वर चरनी प्रार्थना.
शांति....... शांति.......... शांति............
विश्वासच बसत नाहीये.टंकतानाही खूप क्लेश होताहेत. मी आहेच मुळी भोचक हे वाक्य कानात रुंजी घालतय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to धक्कादायक by प्रकाश घाटपांडे
वाचून वाईट वाटलं....
मी आहेच मुळी भोचक हे वाक्य कानात रुंजी घालतय.
सहमत!!!
मे हिज सोल रेस्ट इन पीस...
फारच वाईट घडले... :(
प्रतिक्रिया देणे पण क्लेश देणारे आहे.
अभिनय एक खुप चांगला माणूस....
फार वाईट झाले
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
ओह गॉड!!
फार फार धक्कादायक! :( :(
खरच् खुप वाईट... बातमी आहे ही... त्यांच्या पत्नीचा आणि मुली चा विचार येतोय सारखा...
खरच् खुप वाईट... बातमी आहे ही... त्यांच्या पत्नीचा आणि मुली चा विचार येतोय सारखा...
....
आत्ताच बातमी वाचली होती आणि कुणाकडे कन्फर्म करावे याचाच विचार करीत होतो.
फारच वाईट बातमी.
त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
नितिन थत्ते
अत्यंत दुःखद घटना... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
अतिशय भयानक वाईट बातमी!
आपला एक स्नेही, जो उत्तम अभ्यासु आणि व्यासंगी होता त्याचं असं अचानक निघुन जाणं ह्याचं दु:ख आहे, कुलकर्णी कुटुंबियांना ह्या दु:खाचा सामना करण्याची परमेश्वर शक्ती देवो.
हा देवपण साला एक नंबरचा होपलेस आहे भोसडीचा. चांगली माणसं अशी धडाधड उचलुन नेतो.
अरेरे... फारच वाईट झाले....अभिनय यांना आदरांजली...
अरेरे! खूप वाईट वाटले.
अजुन काय लिहिणार :(
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
खुपच वाईट बातमी....
खरच काय लिहावे सुचत नाही...
आंबोळी
बापरे!!! सुन्न झाले!!
- प्राजक्ता
http://www.praaju.net/
अरेरे.. बातमी वाचून फार वाईट वाटले !
त्यांना सद्गती लाभो !!
--लिखाळ
स्तब्ध !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
ही वाईट बातमी कळल्याने फार त्रास झाला... :(
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
वाचुन खुप वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
बातमी वाचून फार वाईट वाटले.
- पंडित गागाभट्ट.
फारच दु:खद बातमी! भाग्यश्रीताईंना देव हा धक्का पेलण्याचे बळ आणि धैर्य देवो आणि अभिनय-जींच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!
------------------------
सुधीर काळे
अतिशय वाईट बातमी. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयाना हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो.
स्मिता
खुपच वाईट बातमी.
सकाळीच राजाकडून फोनवर बातमी ऐकली आणि सुन्न झालो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
भोचक एक व्यासंगी व्यक्तिमत्व ...
देव असे का करतो ?? खुप राग आला मला देवा चा
त्यांच्या मृतात्म्यांस शांती देवो हीच विनंती.
भाग्यश्री ला हे वाईट दिवस सहन करण्याचे मनोबळ अन सामर्थ्य मिळो .
~ व्यथित ,
वाहीदा
सुन्न झालो वाचताना. काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही.
परमेश्वर कुलकर्णी परिवाराला, त्यांच्या आप्त व दोस्तमंडळींना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
सुन्न करणारी बातमी.
फार वाईट वाटले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
अगदी असहाय्य वाटले. बाकीचे शब्दात नाही सांगू शकत.
आता माझ्या जीटॉकमधला एक दिवा कधीच हिरवा होणार नाही.
बिपिन कार्यकर्ते
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
एक चांगलं व्यक्तीमत्व आपल्यातुन निघुन गेलं.
खुप वाईट वाटलं निधनाची वार्ता ऐकुन.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
सकाळीच म.टा. वर वाचले..
अतिशय वाईट वाटले.. त्यांची मुलगी तर खुपच लहान आहे.
तिच्याकडे बघून तर अजूनच वाईट वाटत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे शक्ती देवो हीच प्रार्थना....
खादाडमाऊ
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
बातमी ऐकुन धक्का बसला.
मिपावरचा "पाव मार्काचा धडा" हा त्यांचा लेख वाचुन त्यांच्या ब्लॉगला भेट दिली होती.
"माय मावशी आणि माझी लेक" ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला मराठी नाळेशी जपण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे/किस्स्यांचे वर्णन वाचुन फार भावुक झालो होतो.
हसत्या खेळत्या/मिश्किल भाषेत लिहिणार्या ह्या कलमबहाद्दराचा असा आणि इतक्या लवकर झालेला अंत मनाला चुटुपुट लावणारा आहे.
भोचक ह्यांचा ब्लॉग.
ईश्वर अभिनय कुलकर्णीच्या आत्म्यास सद्गती देवो.
तसेच कुळकर्णी कुटुंबियांना हे दु:ख पचविण्याचे सामर्थ्य देवो.
- योगेश
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
...... काय बोलावे कळत नाही.
खुप वाईट बातमी.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
:''(
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
.
परमेश्वर अभिनयच्या आत्म्यास शांती देवो.
खुप धक्कादायक आहे बातमी.
अतिशय दु:खद घटना आहे..
अतिशय वाईट वाटलं. आधी 'सच्चा माणूस' वाचलं आणि त्या लेखाच्या अत्यंत अनपेक्षित शेवटाने विलक्षण धक्का बसला.
कुलकर्णी परिवारास धीर मिळावा हि प्रार्थना :(
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
फार वाईट घटना! विश्वास बसत नाही.
:(
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
धक्कादायक बातमी.
-दिलीप बिरुटे
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
भोचकरावांशी भेट राहूनच गेली. आता ते कधीच शक्य नाही :(
- नीलकांत
वाचुन हळ्हळ वाटली.
कालच्या मराठी न्युजलाही बातमी होती. त्यात अभिनयच नाव येत होत.
काय?