तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
लेखनविषय:
काव्यरस
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
आटवतय तुला शेतान भात लावताना
तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना'
कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस
पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस
त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता.
हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता.
त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय
मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
वाचने
10241
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
शेवटच कडव अप्रतिम =D> =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
काय जबरा लिवलंय रे! =D>
(चारडोलेवाला)चतुरंग
असंख्य दहाच्या नोटांचा पाऊस ओवाळून टाकतो .
जयपाल फोटो टाक.
In reply to टाळ्या आणि by रामदास
डॉलर चालवुन घ्या ;)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/बाला लै दिसांनी लिव्हलस.
पर येकदम ब्येस.
-(बालाचा फ्यॅन ) गणा
In reply to बाला लै by गणपा
बाला लै दिसांनी लिव्हलस.
पर येकदम ब्येस.
(बालाचा फ्यॅन )केशवसुमार
In reply to असेच म्हणतो.. by केशवसुमार
असेच!
In reply to असेच by श्रावण मोडक
मस्त !!!!!
जियो !!
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to क्या बात है !!! by मिसळभोक्ता
जबरदस्त
In reply to +१ by नंदन
;-)
जल्ला.....कं लिवलंस रे दादूस.....येकदाम रापचिक....
In reply to जल्ला.....कं by प्रभो
जल्ला.....कं लिवलंस रे दादूस.....येकदाम रापचिक....
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
क्या बात है दादुस !! जबरा !!!
एकदम पिवर रे.
--टुकुल
बाला, एकदा भेटच. तुला माझ्याकडून आख्खा खंबा!!! त्याखाली बातच नाय बोल...
बिपिन कार्यकर्ते
जबरा.
क्या बात! क्या बात! क्याऽऽ बात!!
वेलकम बॅक मिथुनदा!
लय भारी रं बाला!
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय
चिक्कार दिस झाल बाय
लै खास रे दादूस.....
आम्हा बहुतेकांची हीच बात असते...
अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे


एकदम पिवर माल.....ब्येस्ट.... ;;)
वेताळ
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय
मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय
अरे संसार, संसार; खिरा येलावरचा तोड
येक तोंडामधे कडू, बाकी अवघा लागे गोड!!!
-बहिणाबाई
:)
mastach re bala... jyaabhana lay bhaaree livlyaan...
(marathi typing gandalay) O:)
लै भारी लिवलंस रं दादूस!
बर्याच दिवसांनी का होईना, दिसलास ते बरं वाटलं!
अदिती
जिओ.... =D> =D>
मस्त!!
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय
मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय>>>>>
याचेशी बाडीस. जबरा लिवलंय
जबर लिहीलंय !!
मस्तय :)
Surekh.
छान लिहिलय.
दादूस, परत ये, इकरा समदे वाट बघतेत.......
कविता फारशा कळत नाहीत, हि कळली आणि भावली सुद्द्धा.
खूप आधी वाचली तेव्हाही आवडली होती, पण प्रतिसाद द्यायला सभासद नव्हते झाले नव्हते बहुतेक.
जबरा कविता दादुस