मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रस्ता-२

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)

मी तसा होतो सुखी बघ एकटा
येव्हढे पण सुख मला ना लाभले!

या पसार्‍याचे करावे काय मी ?
कोपरे सारे घराचे संपले 

काय हा रस्ता तरी तू शोधला
'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले

शेवटी ते "केशवा"गत वागले
शेवटी त्यांनी विडंबन पाडले!

सांग तू "केश्या" मला हे एकदा
तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले?

केशवसुमार


वाचने 3344 वाचनखूण प्रतिक्रिया 7

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:27
काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली

सहज Tue, 04/29/2008 - 17:25
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.

मदनबाण Tue, 04/29/2008 - 18:40
ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:35
शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :)