मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवन-मृत्यू!

राघव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच! :) जीवन म्हणजे सागर असतो शांत गंभीर भासणारा.. वादळांस प्रसवणारा.. नवा प्रलय दाखवणारा.. जीवन म्हणजे वादळ असतं खंबीर झाडांना उचकटून टाकणारं.. रूळलेल्या वाटांमधून घोंघावणारं.. पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारं.. जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. मृत्यू म्हणजे अनाहूत चाहूल खंबीर झाडांना उचकटून टाकणारी! पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारी! नवलाईची बीजं रोवणारी! नवा प्रलय दाखवणारी!! शुभम्

वाचने 1590 वाचनखूण प्रतिक्रिया 4

सांगितल्या प्रमाणे न विसरता शब्द पाळला. आनद वाटला जीवनाचा विचार नेहमीच सुखद असतो. छान कल्पना ! कविता आवडली !. जीवन म्हणजे सरिता सम, अल्हड बालपणी खळाळणारं, तारुण्यांत सैरावैरा वाहणारं, संसार सागराच्या उधाणांत विलीन होणारं.

यशोधरा 08/07/2010 - 21:17
जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. हे सगळ्यात आवडलं.

राघव 09/07/2010 - 09:53
जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय. राघव