हाच आपला ढंगु आहे...
टायम मोठा झकास आला
आवळा नाड्या सावरा चड्डी
दारू कोंबडी हिरवा गांधी
सुरू नव्याने रोज कबड्डी
धोंडे फेकू गोळ्या झाडू
स्वत: स्वत:चे कपडे फाडू
'कैसी जनता भूखी नंगी'
म्हणत आपणच गळेही काढू
लाठ्या काठ्या अश्रूधूर अन्
कधि एखादी गोळी आहे
थांबायाला वेळ कुणा पण
भाजायाची पोळी आहे
पिचले रडले कुणी भरडले
कैवाराला आपण आहे
फोटो बाईटा काळे झेंडे
चुलीत अपुल्या सरपण आहे
शरम बेशरम नीती अनीती
जुन्या बुकातील फंदा आहे
राजकीय रंडीबाजीचा
खुल्लमखुल्ला धंदा आहे
कुबड्यांचेही शॉर्टेज झाले
जो तो साला पंगु आहे
'अपनेकू क्या करना यारों?'
हाच आपुला ढंगु आहे...
वाचने
3420
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
:-)
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
+१. आवड्या. -Ni
In reply to +१. आवड्या. -Ni by Nile
+२
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+३
च्यायला
एक लंबर रे
लय भारी राव ! !
झकास
छान पद्यरचना आहे.
ज ब र्या
एक नंबर...........
_/\_
In reply to _/\_ by धमाल मुलगा
+ येस ती एक लै भारी झाली होती राव जुगलबंदी!
मस्त
मस्त हो
मस्त!! शब्द
खुप
जळजळीत शब्दरचना!
सही
थ्यांक्यू