(गूळ)
काव्यरस
लई दिसांनी दिसले 'रुळ' मग काय आमची गाडी सुटलीच! ;) धन्यवाद नानासाहेब!!
हातात कालथा
घेवुन आम्ही ढवळायचो
ती एका काहिलीवर लक्ष ठेवायची अन्
मी दुस-या चुलाणावर नजर ठेवायचो
घाम गाळत
ढवळत असतांना बोलत असतांना
असंच गुर्हाळ आपणही काढायचे
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
मालकाच्या पोराबरोबर रुळावरुन
कधीतरी तिची गाडी निघुन गेली
मी मात्र काढत आहे त्याच काहिलीतून
गूळ पिवळाधम्मक, आरवाळ... सीझन टु सीझन.
वाचने
5868
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मस्तच पण करुण :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
रंगाशेठ , पेटले...धा मिन्टात विडंबन....:)
धन्य आहात रंगाशेठ , मुळ कविता वाचुन होत नाही तोवर विडंबन तयार..
आवांतरः बाकी नेहमीचे ग्लास, दारु आदी विषय टाळुन केलेल विडंबन भावलं
विडंबन चटका लावून गेले!


In reply to विडंबन by विसोबा खेचर
असेच म्हणतो...
बिपिन कार्यकर्ते
हॅ हॅ हॅ ... आवडलं... गूळ पाडणं! ;-)
अदिती
पब्लिक लय गूळ काढतंय आज ;-)
:) मस्त
रंगा ला आवरा !!! :)
हेहेहेहे :)
हा हा हा...
विडंबन
अवांतर - याला जिवाची 'काहिली' करणारं विडंबन म्हणावं काय? ;)
आग्ग्ग्गायायाया!
मला माहित नव्हतं हे प्रकरण!
रंगरावही काही कमी नाहीत. 'तू नही तो और सही' असा विचार केलाच ना शेवटी?
रेवती
In reply to आग्ग्ग्गा by रेवती
घ्या घरचा आहेर..
रंगाशेठ जरा जपून दुसर्या चुलाणावर नजर ठेवा..
तुमच्यावर पण कोणाची तरी नजर आहे विसरू नका..
(काडेपेटी)केशवसुमार
बाकी गुर्हाळ मस्त जमल हे.वे.सां.न.
(अरवाळी)केशवसुमार
In reply to आग्ग्ग्गा by रेवती
आणि तू त्या बोस्टनात वडाची झाडं शोधत फिरते आहेस .सनम बेवफा.
मस्त हो रंगिलेराव
--अवलिया
मस्तच पण