"टिंग्या" एक ह्रद्यस्पर्श अनुभव.
In reply to अरे वा by आनंदयात्री
In reply to हा चित्रपट by मुक्तसुनीत
In reply to व्ही सी डी by भडकमकर मास्तर
In reply to मुद्दा मान्य. by मुक्तसुनीत
In reply to धन्यवाद..... by भडकमकर मास्तर
In reply to तुमचे आरोप by मुक्तसुनीत
In reply to मुद्दा मान्य. by मुक्तसुनीत
In reply to व्ही सी डी by भडकमकर मास्तर
In reply to सहमत नाहि. by अभिज्ञ
In reply to सन्दर्भ.... by भडकमकर मास्तर
In reply to यातना.... by अभिज्ञ
In reply to यातना.... by अभिज्ञ
In reply to लग्नाला तिकिट by आनंदयात्री
In reply to लग्नाला तिकिट by आंबोळी
In reply to थोडासा गैरसमज... by धमाल मुलगा
In reply to वा संयत प्रतिसाद by आनंदयात्री
In reply to आता by धमाल मुलगा
तर नक्कीच मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल? हम्म्म्म.. हे विधान जरा विचारमंथनीय आहे. अहो कोणाला वाटणार नाही मराठी रंगपट दणदणून निघावा. पण काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले). (१-२% अपवाद वगळता.जसे उत्तरायण, श्वास, वळू, टिंग्या, डोंबिवली फास्ट, तू तिथं मी इ.) बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवर्याला, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ इ. मनोरंजक चित्रपट देणारा सचिन नवरा माझा नवसाचा देतो, धुमधडाका, थरथराट, दे दणा दण, झपाटलेला महेश कोठारे 'क्यू की मै झूठ नही बोलता' चे मराठीकरण - नाव पण आठवत नाही. पूर्वीच्या लावण्या बघायला अजूनही मस्त वाटते आणि आत्ताच्या - न बोललेलेच बरे. हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का? किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज? चांगली गाणी कोणाला आवडत नाहीत. फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते? सांगा बरं काल परवा निघालेल्या चित्रपटांची नावे, लक्षात राहिलेले कलाकार, लक्षात राहिलेली गाणी, लक्षात राहिलेले विनोद? मराठी रंगपटाचा प्रेक्षकवर्ग म्हणाल तर त्याला जे हिंदीत बघायला मिळतेय आणि तो बघतोय, म्हणजेच मराठी, घरच्या चित्रपटांकडून नक्कीच त्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. श्यामची आई, गोरा कुंभार, शिवाजी महाराज, पिंजरा, दादा कोंडके, राजा गोसावी, दामुअण्णा, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रंजना, सुलोचना, जयश्री, साधी माणसं, आत्मविश्वास, दोघी, सरकारनामा रुचणारी माणसं पळालेली कोंबडी धरायला का म्हणून जातील. दर्जा दाखवा पावती मिळेल. * वरील मत हे वैयक्तिक आहे.
In reply to थेटरातच by मनस्वी
In reply to सहमत \ असहमत by आनंदयात्री
थेटरात पाहिल्याने मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात? वेळ खर्च, पैसा खर्च, स्टोरी समजून घेता घेता डोक्याची मंडई. आजचा सामान्य मराठी माणूस त्यापेक्षा मिसळपाव / वडापाव / भेळ खाईल, ताम्हिणीच्या घाटात फिरायला जाईल.
In reply to कोण का नाना मामा? by मनस्वी
In reply to टुकार पिक्चर अन थेटर by आनंदयात्री
श्वास, डोंबिवली फास्ट, डोह, सरीवर सरी अशीच काही चांगली चित्र पण येतात ती पहायला मात्र थेटरातच जायला पाहिजे,मान्य.
खरच या लोकांकडे दुबइचा पैसा नाही.म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा? श्यामची आई पठडीतला पिक्चर दाखवायला लागतात का करोडोंचे सेट्स, फॉरेन लोकेशन्स आणि स्पेशल इफेक्ट्स? आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.
In reply to दुबईचा पैसा by मनस्वी
In reply to थोडासा गैरसमज... by धमाल मुलगा
काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले). ...न बोललेलेच बरे. हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का? किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज?अगदी मान्य! पण ह्याच्या मुळाशी दुष्टचक्र आहे. 'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'...आणि 'दुसरं काही नाही म्हणून हेच बघतो' सास-बहू इ.इ. प्रकार आधी बघायचे, नंतर चटक लागली की टाळता येत नाहीत! लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही. बरं, काही वेळा दर्जेदार देणार्यांनाही सवंग देणं भाग असतं... प्रत्येक प्रकारची लाट येत असते, इनोदी की इनोदीच....बांगड्या आणि तंगड्या की तेच ते...रोमँटीक आले की फटाफट तसलेच आणखी चित्रपट. इथं अस्तित्व टिकवणं हे देखील एक कारण असतं. शेवटी वाहत्या गंगेत हात धूणं कोणाला नकोय? फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते? अभिरुचीसंपन्न प्रेक्षक/रसिक नक्कीच चांगलं तेच उचलतात...पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, ह्याची खात्री वाटली नाही की मग असं व्हायला होतं! आजही चांगले चित्रपट निघत आहेत. आता, नाण्याच्या बाजूप्रमाणे चांगल्याबरोबर वाईटही येणारच. फरक एव्हढाच आहे की वाईट जास्त आहे, चांगलं कमी. कारण सोपं आहे, चांगल्या कलाकृतीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, विषयाचा योग्य अभ्यास करावा लागतो. त्यात वेळा खर्ची पडतो, पैसाही लागतो...एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट. मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. गजेंद्र, मंगेश, किंचित संतोष ही आणि अशी मंडळी नक्की मराठी रंगपटाला वर आणतील. हळू हळू प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलतील...सातत्याने असे दर्जेदार चित्रपट आल्यानंतर त्यांची सवय लागून फालतू प्रकार प्रेक्षकांकडून नाकारले जातील. पण..थोडा धीर धरायला हवा, पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?
म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा?दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच : 'नाही' आणि कोण म्हणतं करोडोंनी पैसा ओतले की चित्रपट चांगले बनतात? लो-बजेट वाले नागेश कुकनुरचे चित्रपट आहेत साक्षीला.. आणि भव्य-दिव्य सेट्सवाले गर्भश्रीमंत चित्रपटही...जे सडकून आपटले आहेत. अर्थात हा नियम सार्वत्रीक नाही. दुबईचा संदर्भ मी अबबशेठच्या हिंदी-मराठी चित्रपट तुलनेशी बोलताना दिला होता.
आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.त्यासाठी गरज आहे ती उत्तम लेखकांची, दिग्दर्शकांची आणि सकस अभिनयक्षमतेच्या अभिनेत्यांची...हे सगळं येतं ते पैसा ओतूनच. मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला? हाच माझा सूर आहे...चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा म्हणण्यामागे.
In reply to मनस्वीचे मुद्दे... by धमाल मुलगा
'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'हे विधान चुकीचे वाटते (तुझे नाही, जो करतो त्याचे.) ही प्रेक्षकांची आवड अजिबात नसते, म्हणूनच गर्दी खेचत नाही.
लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही.बरोबर आहे. पण सिनेमा, नाटक, मालिका हे समाजाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे असे मी समजते. आजच्या मालिका बघणार्या बहुसंख्य महिला वर्गाची सायकोलॉजी बदलण्याची शक्ती त्यांच्यात असते आणि त्यांनी ती सत्कारणी लावावी असे मला वाटते. आज विचारले तुला टिपरे आवडेल की या सुखांनो - तर पटकन टिपरे हेच उत्तर येईल. रडुबाई, हतबल, काळी जादू, जळुबाई, खलनायकी विचार न येता आधीच टेन्शनमध्ये असलेल्या बायकांच्या मनात हलकेफुलके, प्रगल्भ, विनोदी, खंबीर असे विचार यावेत असे मला वाटते.
पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच,हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.
एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट.बरोब्बर. म्हणून पोळी भाजून घेणार्याने भाजावी पोळी. पण ती पोळी त्यांची त्यांनाच खावी लागणार आहे हे विसरू नये. असे म्हणू नये मराठी प्रेक्षकाने पाठ फिरवली वगैरे.
मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. थोडा धीर धरायला हवा.मान्य आहे.
पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.
मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला?हो, मी सहमत आहे. म्हणूनच म्हटलं, चांगला मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाउनच बघावा. आणि त्याची सीडी / व्हीसीडी पण ओरीजनलच घ्यावी. टुकार चित्रपटांची पायरटेड तरी कोण घेणारेय?
मुळात तुम्हाला "श्रीमंत झालेला मराठी" पहायचाय की "श्रीमंत झालेली मराठी" पहायचि आहे? पहा, दोन्हित खुप फ़रक आहे.पहिल्या प्रकार घडल्याने दुसरी गोष्ट घडेलच असे नाहि,पण दुसरा प्रकार घडला तर पहिले प्रकार लाखोंनि पहायला मिळतिल.क्या बात है! नक्कीच!
पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.तेच रसिक मी अश्या अर्थानं म्हणालो, की जे कलेसाठी गर्दी करतात..जीव टाकतात.
पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय? बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.सुरुवात झालेली आहे... निव्वळ इनोदी चित्रपटांचा रतीब घालून तेच ते दाखवणं कमी झालं असून सुधारित दर्जाची निर्मीती चढत्या भाजणीने निदर्शनास येऊ लागलेली आहे.
मग मला तरी हाच प्रश्न पडतो कि च्याइला आपणच का एवढे कर्मदरिद्रि? का नाहि आपले चित्रपट चालत,ते हि आपल्याच राज्यात!!!!!!!!!!:-)) जेव्हा एक देशपांडा एका जोश्याशी सार्वजनीक ठिकाणी बोलताना देखील मायमराठीचा वापर करायला लाजतो तेव्हा हा प्रश्न विचारणंच चूकीचं ठरतं. सर्वसाधारण मनोवृत्ती म्हणजे, "थेटरात जाऊन तिकीट काढून पिक्चर बघायचं आणि तेही मराठी? काय येडा झालास का तू?"
अरे मित्रा, जर तुझ्या सिनेमाच्या पाय़रेटेड सि.डि. बाजारात आल्या तर त्यातूनहि तुलाच प्रसिद्धि मिळते. लोकांना नाहि.त्याप्रसिद्धिवर तुलाच पूढचे चित्रपट जास्त फ़ायदा करतिल.काही प्रमाणात असहमत. प्रसिद्धी नक्कीच मिळते, कित्येकांची अशीही उदाहरणं आहेतच की, ज्यांचे चित्रपट सडकून आपटले, कुत्रंही गेलं नाही बघायला, पण त्यांना पुढे कामं मिळत गेली...यशस्वीही झाले.
सगळी कडे आर्थिक गणितेच पहायचि.नाहि का?का नाही? मायबाप प्रेक्षक, कलेची सेवा इ.इ. सगळ्या गोष्टी मनाला समाधान देतात, पण त्या समाधानाच्या जोरावर मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश नाही घेता येत, त्यासाठी मोजावा लागतो तो पैसाच. दोन वेळचं जेवण-खाण, औषध-पाणी हे समाधानाने नाही विकत घेता येत. पुर्वीचे मराठी अभिनेते आर्थिक गणितं पहायचे नाहीत, काही अपवाद वगळता काय झालं त्यांच्या आयुष्याच्या शेवटी?
नाटक घ्या.पुणे मुंबई सोडले तर नाटकाचा प्रोडुयुसर मराठवाडा,विदर्भ अशा लांबच्या ठिकाणि जायला नाखुशच असतो. का तर तिथे नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल अशि शंका.शेठ, एके काळी आम्हीही व्यावसायीक नाटकं केली आहेत. एका दौर्याचा खर्च किती येतो, काय त्रास पडतो हे चांगलं ठाऊक आहे. स्थळाप्रमाणे आवड बदलते. पुणे-मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी फार्सिकल शिवाय फारसं काहीच चालत नाही. पुण्या-मुंबईत 'गोलपीठा' चाललं(!) म्हणून ते इतर ठिकाणी चालेलच ह्याची वेडी आशा बाळगणं योग्य नाही. तिथे 'मोरुची मावशी' आणि 'वासुची सासु' च न्यायला हवं. असो, बरंच पुराण चालवलं मी. आता थांबतो. मुक्तसुनीतराव, अभिनंदनाबद्दल आणि विशेष दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. -ध मा ल.
In reply to पायरसी..... by प्रभाकर पेठकर
In reply to आता by डॉ. श्लोक _भातखंडे
In reply to :) by मनस्वी
In reply to प्रेम. by प्रमोद देव
In reply to प्रेम. by प्रमोद देव
अरे वा