नको तेच झाले
लेखनविषय:
पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही
जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
वाचने
7776
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
वाह...
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
A वन !!! :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
काय बोलावं आता.. असा प्रश्न पडावा इतकं छान लिहिलंय! :)
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही ... या द्विपदी विशेष आवडल्यात!!
अवांतरः कवितासंग्रह कधी काढताय ते सांगा आता आधी.
राघव
क्रान्तिकारी गजल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
In reply to जबरदस्त by jaypal
सहमत !! :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
तसेही ही कविता छानच आहे.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
कविता आवडली.
व्व्वा!! व्वा!!
मस्तच!!
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही
फारच सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
एक प्राजुतै व दुसरी क्रांती....... ह्याच्या कविता सोप्या व आपल्याच वाटतात :\
वेताळ
In reply to क्रांतीच्या कविता खुपच मस्त असतात. by वेताळ
वेताळोबांशी अगदी सहमत आहे.
ह्या दोघींच्या कविता वाचायला आवडतात आणी मुख्य म्हणजे त्या वाचल्यावर कळतात.
मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेहीहे जबर्याच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
वा
छान कविता..
मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेहीसर्वात भारी!!! - लोकमान्य विद्यालयचा सउशानत
मराठीत सेमिकोलन आहे का ?
मला अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्हे आठवतात. पण सेमिकोलन आठवत नाही.
नसल्यास, सेमिकोलनला पौणविराम म्हणावे का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to सेमिकोलन by मिसळभोक्ता
त्याला अपूर्णविराम म्हणतातसे वाटते.
मी अनेकदा वापरतो. (अर्थात याने काहीही सिद्ध होत नाही म्हणा.)
पण प्रस्तुत कवितेत तो अस्थानी आहे असे वाटते.
- पंडित गागाभट्ट.
In reply to आहे by पंगा
त्याला अपूर्णविराम म्हणतातसे वाटते.
आणि कोलन ला ?
ता. क. कोलन म्हणजे ":", "====" हा नाही.
(नीचभ्रू)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to अच्छा by मिसळभोक्ता
':' याला विसर्ग म्हणतात बहुतेक.
पुष्करिणी
In reply to ':' याला by पुष्करिणी
; अर्धविराम, : अपूर्णविराम
(इति वीरकरांचा शब्दकोश)
In reply to ; अर्धविराम, : अपूर्णविराम by धनंजय
कोलन अपूर्ण म्हटला, तर काय काय लीक होणार ? शी !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to अच्छा by मिसळभोक्ता
; (सेमायकोलन) आणि : (कोलन) यांपैकी एकाला अर्धविराम आणि दुसर्याला अपूर्णविराम म्हणतात एवढे अंधुकसे आठवते. नेमका कुठला कोण याबद्दल खात्री नाही.
बहुतेक धनंजयशेठने वर दिलेले बरोबर असावे.
"====" हा नाही.कोलन आडवा?????? - पंडित गागाभट्ट.
In reply to थोडा गोंधळ होतोय... by पंगा
वरिल संभाषण पाहुन वाट्टे , पंग्यादादाला आणि भुक्त्याकाकाला वेळंच वेळ आहे ..
=)) च्यामायला .. एवढी सुंदर कविता , तिचं रसग्रहण करायचं सोडुन कसल्या कोलनच्या न विसर्गाच्या मागे लागलेत हे लोक ?
-(राजकारणी) प्रा.डॉ.दिल्लीत शिरुदे
In reply to थोडा गोंधळ होतोय... by पंगा
पंगाशेठ,
अंमळ पहुडा मग,
कोलन आडवा??????
हा प्रश्न पडणार नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to सेमिकोलन by मिसळभोक्ता
कवितेबद्दल लिवा की!!
मस्त प्रश्न .......नाही खरच विचार करण्यासारख आहे नी माझ्यासारख्यांना तर होच.
पुर्णविराम,comma असला की वाचताना काय बदल करायचे ते माहीती आहे,पण ; हे असल की अशा वेळी काय करायच????
नसल्यास, सेमिकोलनला पौणविराम म्हणावे का ?पौण????? म्हणजे???? आणि तेच का???
वा! क्या बात हैं! :)
छानच कविता, आवडली.
पुष्करिणी
कविता छान आहे, पण सेमिकोलन मुळे नीट फोकस होत नाही.
स्वल्पविराम चालला असता.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to छान आहे by मिसळभोक्ता
बोंबला आता शुद्धविरामचिन्ह आग्रह देखील? बघा नको तेच झाले म्हणायचे की... :P
कशाला निमित्ते हो सेमीकोलनाची?
विरझण लावले; असेही, तसेही
कविता छान आहे पण सॅड साँग आहे :-(
In reply to :-) by सहज
आणी मिभोंना सहजरावांचा टोमणासुद्धा तितकाच फक्कड ;)
In reply to कविता फक्कड क्रांतिताई... by लवंगी
लवंगीताई,
"फक्कड" हा अंमळ अश्लील शब्द आहे.
धन्यवाद.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to :-) by सहज
एक काय ते ठरवा.लस्सी पीत आणि तपकीर ओढत इतरांच्या प्रतिसादांवर टीका करणार्या हिणकससम्राटांप्रमाणे 'गळ्यात कळ्यात' नको...
बाकी
"भोक्त्या -द विरजनवाला " कधीपासुन ताकाला भांडे लपवायला लागला ?
- उकळहप्ता
In reply to छान आहे by मिसळभोक्ता
पण सेमिकोलन मुळे नीट फोकस होत नाही.कॅन्सर म्हणजे (माझ्या समजुतीप्रमाणे) शेवटी (पेशींची) अमर्याद आणि नियंत्रण सुटलेली वाढ हे लक्षात घेता, ही कविता (सेमि)कोलन-कॅन्सरग्रस्त म्हणून घोषित करता यावी काय? (माझी समजूत चुकीची असल्यास: चूभूद्याघ्या.) - पंडित गागाभट्ट.
In reply to शंका by पंगा
दोज हू फोकस ऑन सिंटॅक्स रादर दॅन सिमँटिक्स आर बाउंड टु गेट अफ्लिक्टेड विथ द कॅन्सर ऑफ द सेमाय कोलन.
(ता.क. अभिजात संगिताला शास्त्रीय म्हणवून घेणारे तथाकथित संगीतज्ञ्य देखील ह्याच विकाराने ग्रस्त असतात.)
क्रान्तिताईंनी स्वल्पविराम वापरायला हवा होता, एवढेच म्हणतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
आवडली.
-दिलीप बिरुटे
क्रांतिताई,
सुरेश भटांचा वारसा चालवणार तुम्ही!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही आवडली.
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
या द्विपदीत 'या' आणि 'जगाचेच' तुटतात. काही वेगळे केले असते तर अधिक प्रभावी झाले असते. (ही प्रतिक्रीया वृत्त, मात्रा, छंद यांच्याशी संबंधित नाही, कारण अज्ञान!)
In reply to वा by श्रावण मोडक
काही वेगळे केले असते तर अधिक प्रभावी झाले असते.मला क्षणभर वाटलं ही गुर्जींचीच की काय प्रतिक्रीया ... पण भुवया उंचवुन पाहिलं .. हे तर आपले श्रामो :) असो :)
छान लिहितेस क्रांती..
गझल आवडली..
कविता आवडली.
मला