लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार
या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात. भारतात लुईजच्या मृत्यूची दखल इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांनी घेतलेली दिसली नाही. म्हणून या खट्याळ, 'दुर्गुणी' कलाकाराचा परिचय करून देण्याचे मनात आले.
लुईजचा जन्म १९११ मध्ये पॅरिसच्या एका उपनगरामध्ये झाला. पॅरिसमध्ये कलाशिक्षण घेतल्यानंतर १९३८ मध्ये आपल्या अमेरिकन नवर्यासह ती न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाली. आपल्या अभिव्यक्तीसाठी तिने प्रामुख्याने शिल्पकला हे माध्यम निवडले. त्यात ती सातत्याने काम करत राहिली. आज ती विसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाच्या कलाकारांमध्ये गणली जाते, पण तिचे पहिले मोठे प्रदर्शन १९८१ मध्ये, म्हणजे वयाची सत्तरी गाठल्यावर, न्यू यॉर्कच्या म्यूझिअम ऑफ मॉडर्न आर्ट (MoMA) मध्ये भरवले गेले. यावरून एका स्त्रीला कलाजगतात प्रस्थापित होण्यासाठी किती झगडावे लागते, हे लक्षात यावे. MoMA मध्ये एकल प्रदर्शन झालेली ती पहिली स्त्री होती. त्यासाठी निव्वळ विसावे शतक नाही, तर १९८१ साल उजाडावे लागले, हे ही लक्षात घ्यायला हवे.
पुरुषांविषयीची तिची मते घडवण्यात लहानपणीच्या एका अनुभवाचा मोठा हात होता. आपल्या वडिलांचे आपल्याच दाईशी शरीरसंबंध असल्याचे तिच्या लक्षात आले, तेव्हा ती ११ वर्षांची होती. ही गोष्ट आईला ठाऊक असूनही ती सोईस्करपणे वा नाईलाजाने तिच्याकडे दुर्लक्ष करते, हेही लुईजच्या लक्षात आले.
पुरुषप्रधान जगातल्या या पुरुषी कटात सामील होण्याच्या स्त्री-पुरुषांच्या सनातन प्रवृत्तीला लुईजने आपल्या कलाकृतींत अनेक पध्दतींनी हाताळले. उदा. क्युम्युल १ (१९६९) हे शिल्प पाहा.
त्याचे नाव क्युम्युलस या ढगांच्या प्रकारावरून घेतले होते. पण आकार बदलणार्या ढगांच्या रुपात एकाच वेळी स्त्रियांचे स्तन, पुरुषांची लिंगे वा डोक्या़खेरीज संपूर्ण शरीर झाकणारे ख्रिस्ती जोगिणींचे बुरखे-झगे यांचा आभास होतो. लुईज मात्र म्हणते, 'यात मला तर काही लैंगिक आकार दिसत नाहीत!' म्हणजे, दोष असलाच, तर तो पाहाणार्याच्या दृष्टीतच आहे.
'यानुसचा मोहोर' (१९६८) या शिल्पातही अशी गंमत आहे.
यानुस हा दोन तोंडे असलेला एक ग्रीक देव होता. त्याला भूत व भविष्य दोन्ही कळायचे, असे मानतात. त्याच्या पारंपरिक, दुतोंडी चित्रणपध्दतीचा वापर करून लुईज आणखी एक खेळ करते. कापसाचे बोंड उलावे, असे दिसणार्या या मोहोरात दोन टोकांची तोंडे ही पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा आभास निर्माण करतात, तर मधील उलून येणारा भाग हा स्त्रीच्या लैंगिक अवयवाचा आभास व्यक्त करतो. जणू परंपरेने पुरुषी मानलेल्या दुतोंडी देवाच्या चित्रणात दोन मेंदूंच्या जागी स्त्री आहे!
पुरुषप्रधान व्यवस्थेत कुटुंब हा एक मोठा घटक असतो. 'सेल' नावाच्या मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) गटामध्ये (१९९०-९३) कुटुंबव्यवस्थेवरील टीका दिसते. उदा. खालच्या चित्रात दिसणारे घर हे लुईजचे बालपण जिथे गेले त्या घराची प्रतिकृती आहे. ते एका पिंजर्यात आहे, व त्यावर एक गिलोटिन लटकते आहे. स्त्री जोवर घराची जो़खडे झुगारून बाहेर येत नाही, तोवर ती अडकून राहणार व शेवटी क्रूर पध्द्तीने तिचा शिरच्छेद होणार, असा काहीसा भाव यात जाणवतो.
'मामेल' (१९९१) नावाचे तिचे हे रबर शिल्प पाहा.
अभिजात भित्तीशिल्पासारखी रचना असलेले हे शिल्प म्हणजे लोंबकळणार्या स्तनांची एक रांग आहे. स्त्री पुरुषांचे पोषण करते, पण अनेक पुरुषांना ती निव्वळ वासनेची एक वस्तू वाटते. स्त्रीलंपट पण मूलतः स्त्रीद्वेष्ट्या अशा या 'डॉन युआन' प्रवृत्तीचे लुईजला यातून चित्रण करायचे होते. 'एका स्त्रीकडून दुसर्या स्त्रीकडे फिरत राहणार्या, त्यांचा भोग घेणार्या, पण त्यांना काही न देणार्या अशा स्वार्थी पौरुषाचं हे चित्र आहे.' असे स्वतः लुईजने या शिल्पाविषयी म्हटले आहे.
लुईजचे खेळ नेहमी टीका करणारेच होते, असे नाही. उदा. 'नजरेला नजर' (१९७०) या गुळगुळीत, संगमरवरी शिल्पामध्ये एक हळुवारपणा जाणवतो. त्यात उभी लुईज ही जणू लुचू पाहाणार्या मुलांच्या मध्ये उभी असणारी आई वाटते.
पण गुळगुळीतपणा हा फसवासुध्दा असू शकतो. उदा: 'स्त्री सुरी' (१९८२) या अत्यंत आकर्षक दिसणार्या शिल्पात सुरीवजा धमकीही आहे.
स्त्री असण्यामागचा ताणही तिच्या 'आर्च ऑफ हिस्टेरिआ'सारख्या (१९९३) शिल्पांत दिसतो.
गृहिणी-सखी-सचिव असल्या पारंपरिक स्त्री-प्रतिमेला छेद देणारी आणि स्त्रीत्वातल्या मऊ-खडबडीत, आकर्षक-धोकादायक, खेळकर-जीवघेण्या अशा द्वैताला सामोरे जाण्यास भाग पाडणार्या लुईज बूर्ज्वाची ही काही उद् धृते:
मी नरकापर्यंत जाऊन परत आलेली आहे, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते सर्व अद् भुत होतं.
जे म्हणायला लोकांना भीती वाटते, ते कलाकार व्यक्त करू शकतात.
स्वतःला व्यक्त करणं हे एकाच वेळी पवित्र आणि जीवघेणं असतं.
अधिक माहितीसाठी पहा.
वाचने
18093
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
ह्मम्म...ने
जगदंब ...
खोडसाळ नि डेन्जर
अगायायाया
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
असेच म्हणतो...
कदाचित
उत्तम
उत्तम परिचय
ओळख आवडली
In reply to ओळख आवडली by सहज
+१
लै भारी.
अफाटच आहे!
ओळख आवडली.
Probably Emotional Insecurity has made them so rebellious...
डोक्यात येणारे प्रश्न
In reply to डोक्यात येणारे प्रश्न by भडकमकर मास्तर
दादा
In reply to दादा by शुचि
दादा
In reply to डोक्यात येणारे प्रश्न by भडकमकर मास्तर
१. दादा
प्रतिमांचे अर्थबोधन
In reply to प्रतिमांचे अर्थबोधन by चिंतातुर जंतू
उत्तम
In reply to प्रतिमांचे अर्थबोधन by चिंतातुर जंतू
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by प्रियाली
मॅपलथॉर्प
In reply to मॅपलथॉर्प by चिंतातुर जंतू
लेखाच्या
In reply to प्रतिमांचे अर्थबोधन by चिंतातुर जंतू
अतिशय
In reply to प्रतिमांचे अर्थबोधन by चिंतातुर जंतू
अभिव्यक्ति स्वातंत्र्य
चिंतुभाऊ
ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म......
ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म......
In reply to ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म...... by वेताळ
तो देखिल
धन्यवाद रे कोतवाला....
In reply to धन्यवाद रे कोतवाला.... by वेताळ
वेताळाच्य
उत्तम
पुरुषाची अशी बंडखोरी
- 'बंडखोरी'च्या मागे साधारणतः दमनाची पार्श्वभूमी असते. उदा: लुईजची बंडखोरी ही पुरुषप्रधान संस्कृतीत होणार्या स्त्रीच्या लैंगिक व सामाजिक दमनाविरोधात होती.
- बंड करणार्याची ओळख 'पुरुष' ही असेल, तर हे दमन त्याच्या पुरुष असण्याशी संबंधित असावे लागेल. म्हणजे दलित लेखकांनी मराठी साहित्यात केलेली वाटचाल बंडखोरी असूनही ती यात मोडणार नाही, कारण ती 'पुरुष' या ओळखीपेक्षा 'दलित' या ओळखीतून झालेली होती.
- 'अशी' (म्हणजे लुईजसारखी): लुईजची बंडखोरी ही लिंगविशिष्ट दमनाविरुध्द होती, म्हणून त्यात (धक्कादायक वाटू शकतील अशा) लैंगिक प्रतिमा होत्या.
त्यामुळे 'पुरुषाची' 'अशी' अभिव्यक्ती बंडखोर ठरण्यासाठी त्यामागे पुरुषाच्या लिंगविशिष्ट दमनाची पार्श्वभूमी असावी लागेल. म्हणून (उदा.) निव्वळ उत्तान बायकांच्या प्रतिमा एखाद्या पुरुषाने आज या संस्थळावर टाकल्या, तर ती अशी बंडखोरी होणार नाही, पण जर कधीकाळी अशी वेळ आली की या संस्थळावर शाहरुख खानचे (पक्षी: आकर्षक पुरुषाचे; चूभूद्याघ्या ;-) ) छायाचित्र चालेल, पण मधुबालाची हास्यमुद्रा (पक्षी: आकर्षक स्त्री प्रतिमा; यात बहुधा चूभू नसावी :-) ) संपादित होईल, तर मग वरचे ओष्ठनलिकेसहित स्त्रीमुखाचे छायाचित्र टाकणे, ही एक (लैंगिक प्रतिमा असणारी) पुरुषी बंडखोरी होऊ शकेल. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||In reply to पुरुषाची अशी बंडखोरी by चिंतातुर जंतू
पटण्यासारखा फरक
In reply to पटण्यासारखा फरक by धनंजय
पटण्यासार
छान ओळख