मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे क्रांतिकारकांनो!

अजय जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हे क्रांतिकारकांनो, बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला देशासाठी आता वेळ आहे कुणाला? बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला चू.भू.दे.घे.

वाचने 3200 वाचनखूण प्रतिक्रिया 8

विदेश 20/04/2008 - 17:29
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे?

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:38
सुंदर कविता...! आपला, (अंतर्मूख!) तात्या.

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:36
बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला
जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल.

अजय जोशी 22/04/2008 - 09:07
सर्वांना धन्यवाद! (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

In reply to by नादचखुळा

विसोबा खेचर 25/04/2008 - 11:41
अजय भाउ कविता नाद्चखुळा म्हणजे काय? कृपया स्पष्टीकरण द्या अन्यथा आपला प्रतिसाद उडवण्यात येईल.. तात्या.