Skip to main content

आपलं कसं जमणार?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तुला नेहमीच किशोर आवडणार, आणि मी सैगलचा दिवाणा … माझ्या मनात मारव्याचे वेड.., तुझ्या सतारीवर मल्हार फुलणार, ......... आपलं कसं जमणार? तु कायम स्वप्नांची रहिवासी माझे जगणे सदैव उदासी तु सारखा भुप छेडणार… मी मात्र भैरवीत रमणार… .......... आपलं कसं जमणार? आज ना उद्या जमेल मला तुझ्या विनोदावर खळखळून हसणं… तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना वाण्याचं बिल स्मरणार… .......... आपलं कसं जमणार? चल, आपण एक करार करू या? तू काही स्वप्नात यायचं नाहीस… मी काही वास्तवात रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार? विशाल
लेखनविषय:

वाचने 2537
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

कळला नाही >>तुझ्याशी बोलताना वाण्याचं बिल स्मरणार >> आणि हाच माणूस म्हणतो, >>मी काही वास्तवात रमणार नाही… क्या हो रहा है बॉस! 8|

In reply to by अरुण मनोहर

अरुणजी, तो विरोधाभास नाहीये. तो त्याचा प्रयत्न आहे परिस्थिती बदलण्याचा, स्वतःला बदलण्याचा जेणेकरुन त्या दोघांचे जमु शकेल. फक्त ते कितपत जमु शकेल याचीही त्याला शाश्वती नाहीये म्हणुन तरीही त्याला प्रश्न पडतोय की आपलं कसं जमणार. :-) धन्स. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

जमेल, जमेल! (मला आणि माझ्या नवर्‍याला आधीपासून ओळखणार्‍या लोकांना हाच प्रश्न पडला होता, "यांचं कसं जमतं?" ...) अदिती

पर्‍या, धन्य आहेस ! कोपरापासुन दंडवत ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विशाल भाऊ तुमचं नक्कीच जमणार कारण 'Opposite Attracts' ;-) म्हणतात ते उगीच नाही :-) ~ वाहीदा

चल, आपण एक करार करू या? तू काही स्वप्नात यायचं नाहीस… मी काही वास्तवात रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार? काय तो लडीवाळपणा... आहा... :) - फटू

जमलं तर जमलं, नाहीतर बंद करून टाकू तिच्यायला! आहे काय नि नाही काय? - पंडित गागाभट्ट

आभार :) विशेषतः टारोपंत जमादारांचा भावुक प्रतिसाद वाचून गहिवरायला का काय म्हणतात ते झाले ;) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"