अस्तित्वाचा पुरावा!
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही....
---------------------------------------
मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू. पण तिचं अकाऊंट महाराष्ट्रातल्या एका सहकारी बॅंकेत. इकडे इंदूरला ती बॅंक नाही. मग तिला सुचवलं, आपण एखाद्या राष्ट्रीयकृत बॅंकेत तुझं अकाऊंट उघडून टाकू. या निमित्ताने तरी हे काम होऊन जाईल. हाय काय नि नाय काय.
दुसर्या दिवशी कोपर्यावरच्या महाराष्ट्र बॅंकेत तिला सोडून आलो. संध्याकाळी परतलो तर बायकोचा चेहरा हिरमुसलेला. विचारणा केल्यावर कळलं, बाईसाहेबांकडे फोटो आयडेंटीटी म्हणून सरकारी नियमांत बसेल असे काहीही नाही. वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीयकृत बॅंकेत खातं असल्यास पासबुक, नोकरीत असल्यास तिथले ओळखपत्र. यापैकी तिच्याकडे खरोखरच काहीही नव्हतं. गेल्या वर्षीच आम्ही लग्नानंतर 'सहा वर्षांनी' का होईना विवाह नोंदणी करून घेतली होती, त्यावर दोघांचे फोटो आहेत. पण ते चालणार नाही, असं बॅंकेचा अधिकारी म्हणाल्याचं, सौभाग्यवतींनी सांगून टाकलं.
आता प्रश्नच उभा राहिला. फोटो आयडेंटीटी कार्ड आणायचं कुठून? कायम स्थलांतरामुळे दोघांची मतदार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झालेली. पण वोटर आयडी कार्ड काही मिळालेलं नव्हतं. किंवा स्वतःहूनही कधी त्यासाठी प्रयत्न केले नव्हते. बायको नोकरीही करत नाही. पॅन कार्ड काढण्याची वेळही कधी आलेली नाही. गाडी चालवता येत नाही, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. आता काय करायचं?
पॅन कार्ड यात सगळ्यात महत्त्वाचं. किमान हे असेल तरी बर्याच गोष्टी होऊन जातील. म्हणून मग आधी पॅन कार्ड काढायसाठी प्रयत्न करायचे ठरवले. पॅन कार्ड काढण्यासाठी चाचपणी करण्यासाठी गेलो.
जवळच पुण्याच्या एका बॅंकेची शाखा होती. तिथे विचारणा केली. पॅन कार्डच्या नियमावलीतही 'मॅरेज सर्टफिकिट'चा पुरावा म्हणून उल्लेख नाही, काऊंटरवरच्या बाईंनी माहिती दिली. मी हताश. नेटवर शोधाशोध केल्यानंतर त्यात पॅन कार्डसाठी ओळख पुरावा म्हणून 'शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून ते अगदी दहावी, बारावीचं मार्कशीटही चालणार असं लिहिलं होतं. मग त्याचा दाखला देत 'त्यात तरी फोटो कुठे असतो, हा प्रश्न विचारल्यानंतर त्या बाईकडे उत्तर नव्हतं. आमची चर्चा ऐकून बॅंकेचा अधिकारीही तिथे आलेला. बाकीची सगळी कागदपत्र बायकोकडे होतीच. शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावीचं मार्कशीट, रेशनकार्ड. पण यापैकी कशावरच फोटो नव्हता. त्यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पासपोर्ट यातले काही आहे काय विचारले? आमचा नन्नाचा पाढा होताच. अखेर त्यांना कसेबसे समजावून या सगळ्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी आणि मॅरेज सर्टफिकिट घ्या. त्या जोरावर ही माझी बायको आहे हे सिद्ध होईल, शिवाय तिच्या अस्तित्वाचा पुरावाही बाकीच्या कागदपत्रातून दिसेल, असं त्यांना पटवून सांगितलं.
पण तरीही कागदपत्रे परत आल्यास जबाबदारी तुमचीच असे सांगत त्यांनी ही कागदपत्रे स्वीकारायला अखेर तयारी दर्शवलीय.
हे एक काम उरकून महाराष्ट्र बॅंकेत आलो. तिथे खाते उघडायचे काम बाकीच होते. तिथल्या साहेबांना आम्हा दोघा नवरा-बायकोंचे फोटो असलेले मॅरेज सर्टफिकिट दाखवले, म्हटलं, अहो, माझ्यानंतर माझी सगळी मालमत्ता माझ्या बायकोच्या नावावर होण्यासाठी हे सर्टफिकिट तिला उपयोगी पडणार आहे, मग तिच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून हे ग्राह्य धरायला काय हरकत आहे. साहेबांना नियमांकडे बोट दाखवत 'नाही चालणार हो' असं म्हणत हतबलता दर्शवली. बायकोकडे बाकीची ढिगाने असलेली कागदपत्रेही कुचकामीच होती. कारण त्यावर तिचा फोटोच नव्हता. मग साहेबाने विचारलं तुमच्याकडे कॉलेजची काही कागदपत्रे आहेत काय ज्यावर तुमचा फोटो असेल? ......
....... आणि अशा तर्हेने ते सात वर्षे फायलीत बंद पडलेले बायकोचे डिएमएलटीचे सर्टफिकिट बाहेर पडले. सायबाला दाखवल्यानंतर त्याची कळी खुलली. 'हे चालेल', त्याने निकाल देऊन टाकला. मी आणि बायको एकमेकांकडे पहात गालातल्या गालात हसलो. सात वर्षे कुठल्याही कामास न आलेले कुठल्याशा नागालॅंड सरकारने मान्यता दिलेल्या आणि त्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमासाठी दिल्ली विद्यापीठाने दिलेले हे सर्टफिकिट अखेर सरकारी पातळीवर बायकोचे अस्तित्व सिद्ध करायसाठी धावून आले.
सरकारी कारभार म्हणतात तो हाच असावा. नाही काय?
वाचने
9924
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
हा हा हा ....
In reply to हा हा हा .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय तु
In reply to काय तु by परिकथेतील राजकुमार
पूर्ण करा कि राव!
सही
In reply to सही by सहज
लै भारी ! लै
मजेशिर
भोचकरावांनी
भन्नाट अनुभव !!!
हॅ हॅ हॅ..
मस्त
In reply to मस्त by धनंजय
असेच म्हणतो
जबरा अनुभव.
अगदी हाच
झक्कास! आज
मस्त
In reply to मस्त by प्राजु
अय्या!!!!
विनोद काय बुवा?
__//\\__ सरकारी खात्त्याला साष्टांग दंडवत.....
वेगळाच
मस्त अनुभव
मला तर बाई
In reply to मला तर बाई by शिल्पा ब
मला तर बाई
छान अनुभव
अस्तित्व
In reply to अस्तित्व by अनिवासि
सहीच
In reply to सहीच by गोगोल
हेच
In reply to अस्तित्व by अनिवासि
इंटरेस्टींग
मस्त किस्सा!
दाखला
In reply to दाखला by अरुण मनोहर
बँकेतल्या पेन्शनलाही ...
भन्नाट
सरकारवर राग का?
In reply to सरकारवर राग का? by आनंद घारे
घारे साहेब
In reply to घारे साहेब by भोचक
काहीच हरकत नाही
धमाल
माझे अनुभव