मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाककृती हवी आहे -- फिन्गर मिलेट पीठ

शिल्पा ब · · पाककृती
इथे फिंगर millet flour मिळतं ते आणलेलं आहे...एक तर millet म्हणजे काय? नाचणी का ? आणि त्या पीठाच काय काय करता येईल ?

वाचने 5281 वाचनखूण प्रतिक्रिया 10

नि३ गुरुवार, 05/20/2010 - 08:24
जि वस्तु काय आहे आणी त्याचा उपयोग काय आहे?? हे माहीत नसतांना ती वस्तु तुम्ही घरी आणलीच कशाला. ---नि३.

राधा१ गुरुवार, 05/20/2010 - 08:31
मिलेट चा अर्थ आहे बाजरी. तुम्ही त्याची भाकरी, थालीपिठ करु शकता. पराठ्यात ते पिठ वापरु शकता. http://www.milletindia.org/cuisines-recipes.asp

बेसनलाडू गुरुवार, 05/20/2010 - 09:40
विकीपिडियावर येथे दिलेल्या माहितीनुसार मिलेट = बाजरी. याच दुव्यावर मिलेटचे जगातील सर्वाधिक उत्पन्न भारतात होत असल्याचे म्हटले आहे. (दुवादार)बेसनलाडू

सुखदा राव गुरुवार, 05/20/2010 - 10:26
फिन्गर मिलेट म्हणजे नाचणी. तुम्ही त्याच पीठ आणलय म्हणजे ते नाचणीच सत्व आहे. यात भरपूर कॅल्शिअम असत. दूधात घालून खीर करा. दूध, साखर, सत्व एकत्र करुन ५ मिनिट शिजवायच की झाल. व्यवस्थीत नाश्ता होतो.

दिपाली पाटिल गुरुवार, 05/20/2010 - 22:32
शिल्पा, मिलेट फ्लोर चे घावन छान आनि झटपट होतात...थोडं तांदळाचं पीठ + फिंगर मिलेट फ्लोर + मीठ + मिर्ची हे एकत्र करुन घावन्/आंबोळ्या कराव्यात... याचेच गोड घावनही होतात...ऑनलाइन बरीच हेल्प आहे... दिपाली :)

शिल्पा ब गुरुवार, 05/20/2010 - 23:42
माहिती दिल्याबद्द्ल सगळ्यांचे आभार. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

शुचि Fri, 05/21/2010 - 03:36
नाचणीत केवढं कॅल्शिअम असतं. मी मला मुलगी झाल्यानंतर हळीव, नाचणी वगैरे खीरी चापल्या होत्या. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

शिल्पा ब Fri, 05/21/2010 - 07:31
लकी आहेस...मला माहितीच नव्हतं या खिरीविषयी...भाजी पोळी वरण भाताशिवाय काहीच केलं नाही.. :''( *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/