चंपूची जिंदगी
लेखनविषय:
काव्यरस
चंपूची बायको खुपच हैराण झाली होती
नॉट हॅपनिंग जिंदगी वैराण झाली होती
चंपूच्या जीवाला कधी आराम नसायचा
ऑफीसात नुसता काम करत बसायचा
चंपूचा बॉस होता अगदी पक्का शहाणा
दर प्रमोशनला तो शोधी नविन बहाणा
डेडलाईन पठठया कधी विसरला नाही
नऊपूर्वी चंपू घरी कधी अवतरला नाही
चंपूलाही व्हायचंच होतं अगदी बेस्ट
त्यानंही मग कधी घेतली नाही रेस्ट
रात्रंदिन गुलामासारखा राबत राहीला
बढतीसाठी बॉसचे पाय दाबत राहीला
असे दिवसामागून दिवस गेले वर्षे गेली
आणि चंपूची अवस्था फार वाईट झाली
चंपूला ना हल्ली काही आठवतच नाही
कधीकधी चुकून बायकोलाच म्हणतो ताई
शेवटी एक दिवस चंपूला अक्कल आली
प्रमोशनची सारी मोहमाया सोडून दिली
बॉसला म्हणाला तू का रे सतावतो मला
बढतीचा लाडू दाखवून येडा बनवतो मला?
प्रमोशन दे नाही तर ईथून निघून जाईन
इन्क्रीमेंट जरी दिलंस तरी तिथेच राहीन
बॉसही उस्ताद म्हणे तू कुणी मोठा नाही
तुझ्यासारख्या चंपूंना इथे काही तोटा नाही
तुझ्यासारखे चंपू इथे पैशाला दहा मिळतात
करीयरच्या शर्यतीत ते उंदरासारखे पळतात
तू नाही दुसरा कुणीतरी इथे भेटेलंच रे मला
तुझ्यासारखाच दुसरा चंपू बनवेन मी त्याला
वाचने
2534
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
हा . . हा . . हे नंतरचे कडवे वाचा
In reply to हा . . हा . . हे नंतरचे कडवे वाचा by नाना बेरके
लय भारी नाना...
फटू आपले
In reply to फटू आपले by परिकथेतील राजकुमार
थोडी
In reply to फटू आपले by परिकथेतील राजकुमार
हो...
In reply to हो... by फटू
हॅ हॅ हॅ
सही रे
छान कविता.
In reply to छान कविता. by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद