राम राम मंडळी,
अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक!
मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे! :)
साहित्य -
दोन कैर्या
एक चहाचा चमचा मोहरी
दोन हिरव्या मिरच्या
गूळ
नारळ
मीठ
फोडणीचे साहित्य -
साजूक तूप
जिरं.
कृती -
प्रथम कैर्या उकडून घ्यायच्या व त्याचा पन्ह्याला काढतो तसा गर काढायचा. त्यात कैर्यांच्या आंबटपणानुसार (काही कैर्या ह्या फारच आंबट असतात तर काही त्या मानाने इतक्या आंबट नसतात,) गूळ घालायचा व अंदाजाने मीठ घालावं व ते मिश्रण डावाने सारखं करून ठेवावं.
वाटणाचा क्रम -
प्रथम मिक्सरमध्ये मोहरी, थोडं मीठ, मिरच्या व किंचित पाणी घालून ते मिश्रण झकासपैकी वाटून घ्यावं! थोडं पाणी घातल्याने मोहरी छान चढते!
वरील मिश्रण चांगलं वाटून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटीभर खोवलेला ताजा नारळ घालावा व घातलेल्या नारळासकट पुन्हा ते मिश्रण नारळ अगदी छान वाटला जाईपर्यंत वाटावं!
त्यानंतर कैरीगुळाचं ते मगाशी सारखं करून ठेवलेलं मिश्रण मिक्सरमध्ये घालावं आणि सगळंच मिश्रण पुन्हा एकदा अगदी एकजीव होईपर्यंत वाटावं.
त्यानंतर त्या वाटणात भातासोबत जेवता येईल इतपत किंवा कढीइतपत पात्तळ होईल तितकं पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर ते मिश्रण डावेने छान ढवळून घ्यावं व वरतून साजूकतूप जिर्याची चांगली चरचरीत फोडणी द्यावी! (गॅसवर गरम करू नये.)
बस! झाली मोहरवणी तयार!!
चुलीवरचा गरमागरम भात, त्यावर मोहरवणी आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड!
खल्लास..!!
साला, एकदा खाऊन तर बघा आणि सांगा मला कशी लागते मोहरवणी आणि सोबत गरमागरम भात!
हा प्रकार भातासोबतही खाता येतो म्हटलं तर मस्त मिटक्या मारीत चवीने चमचाचमचा पिताही येतो!
"प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं!"
या एकाच वाक्यात मोहरवणीचं व्यक्तिचित्र रंगवता येईल! :)
"चला, उशीर झालाय, आता निघायला हवं! त्या अनुष्काला आज मोहरवणीची पाकृ शिकवायला जायचंय! आज शुटिंगला सुट्टी घेऊन बाजारातून कैर्या आणून ठेवायला सांगितलंय गधडीला! :)
(स्वगत!)
आपला,
(मोहरवणीइतक्याच चविष्ट असलेल्या अनुष्काचा प्रेमी) तात्या देवगडकर.
वाचने
20581
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रथमच
आस्वाद घेउन पहायलाच हवा !!!!!
कैरी ऐवजी हे अननस तसेच स्ट्रॉबेरी
झालं..
:)
In reply to झालं.. by प्राजु
अरे बाबा
मस्त
:)
In reply to मस्त by ठणठणपाळ
आठवण
कधी खाऊ घालता?...
त्याला कोकणीत "खतखतं " असे म्हणतात
In reply to कधी खाऊ घालता?... by प्रभाकर पेठकर
खतखते वेगळे.....
In reply to त्याला कोकणीत "खतखतं " असे म्हणतात by मनापासुन
सहमत
In reply to खतखते वेगळे..... by प्रभाकर पेठकर
मोहर्वनि
वचुन्च तोन्दलपनि सुतले मरथि त्य्पिन्ग जमत नहि
जोडीला संगीत हवे
आभार..
प्रतिसाद
In reply to आभार.. by विसोबा खेचर
तात्या,
:)
In reply to तात्या, by स्वाती राजेश
व्वा
हम्म्म..
नवीन
खतखत वेगले
कोकणि असूनहि माहीत ..........
तात्या,
:)
In reply to तात्या, by स्वाती राजेश
गोवा
उडदा-मेथी...
In reply to गोवा by रामदास
बहुदा 'मेथांबा' असेल.
In reply to गोवा by रामदास
तात्या
वा!
बारीक
धन्यवाद.... त