आभास
Taxonomy upgrade extras
आभास
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा
माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला?
मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता
मुद्दाम आठवांना त्या टाळले कितीदा
होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे
( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)
नव्हते म्हणे कुणाच्या यादीत नाव माझे
मुद्दाम त्यास त्यांनी डागाळले कितीदा
सोनाली जोशी
वाचने
8775
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छान
In reply to छान by धनंजय
+१
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
छान!
दुसरा शेर सर्वाधिक आवडला!
In reply to दुसरा शेर सर्वाधिक आवडला! by चतुरंग
५वा
दर्जेदार..!
सुंदर !!!
क्या कहने...
In reply to क्या कहने... by धमाल मुलगा
असेच
सुरेख !
धन्यवाद
छान
फारच छान
दर्जेदार !