Skip to main content

xxवी झाली तेंव्हा

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 25/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तात्विक युद्धांचा इतिहास कितीही रंजक असला तरी शेवटी शरीरधर्म कुणाला चुकला आहे? पायाचा तिढा करुन केविलवाण्या चेहर्‍याने बंद दाराकडे बघणारे चाळकरी आणि फ्लोरा फाउंटनच्या चौकात टायची गाठ सैल करताकरता विषण्ण मुद्रेने इकडेतिकडे बघत 'ते शहाळे तेवढे प्यायला नको होते..' असा विचार करणारे अधिकारी - शेवटी या सगळ्यांची व्यथा एकच, सगळ्यांचे रिंगटोन सारखेच, सगळ्यांचे पासवर्ड सेम... त्यामुळे राजेश घासकडवींना वंदन करुन xxवी झाली तेंव्हा ती झाली तेंव्हा घळघळ, निश्वास निनादत होता अवघडल्या ओटीपोटी , उद्गार सैलावत होता ती घाई कसली म्हणुनि, सांगावे तरी मी कैसे बुद्धाच्या चेहर्‍यामागे, कल्लोळ माजला होता ती झाली आता म्हणुनि, आनंदे मीही रडलो कल्पनेत माझ्या अंगी, कपडाही भिजला होता अंतरात गमले मजला, या जन्मी सार्थक झाले अब्रूचा शेला माझा, लोकांत वाचला होता ही भिंतीवरची चित्रे, पहाताना गहिवर नाही दुर्गंध साहता माझा, उद्देश नागडा होता
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7041
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

रावसाहेब...तुम्ही यॉर्करवर एकदम षटकारच चढवलात की.

In reply to by प्रमोद देव

हा हा हा. मस्त. जबरी नितिन थत्ते

अगदी जबरा, कविता रावसाहेब असेच लिहीत रहा. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

--- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

शरीरधर्माचे शब्दचित्रच!!! आमचे ठिगळ बघा जुळताय का पण घात जाहला अंती लोटा तो फुटका होता|| हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

एकदम 'पी'वर विडंबन ! ;)

फारच लाघवी विडंबन आहे ते. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

लोल लोल लोल .. पुप्या सारखेच म्हंटलं =)) =)) =)) बाकी काव्य विडंबणावरून मला एक सहि विडंबण सुचलं पण तो बेत आम्ही डिस्कार्ड केला :) सन्जोपराव ... :) - *** *****

विडंबनाची भाषा प्रवाही आहे कारण.. आशयच प्रवाही आहे! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सकाळची सुरुवात "शू"चीर्भूत झाली अगदी या कवितेने. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

सुरेख नाही म्हणता येणार, परंतु एक वेगळीच गझल!
ती घाई कसली म्हणुनि, सांगावे तरी मी कैसे बुद्धाच्या चेहर्‍यामागे, कल्लोळ माजला होता
क्या बात है! :) तात्या.

वा... फारच सुंदर..... या गाण्याचे चांगले विडंबन होउ शकणार नाही हा माझा विश्वास फोल ठरला आज. बाकी घास्कडव्यांना वंदन करायला मुभा राहीलेली नाही अस दिसतय. कुणी 'तिकडे' टाकलीय का रे ? आंबोळी

हा हा हा.

आता १८० अंश फिरवुन पलिकडच्या बाजुचे अवघडलेपण पण येवु द्या. कदाचित "कळा ज्या लागल्या जीवा" या धर्तीवर जमुन जाईल.