आजची स्त्रीची प्रतिमा - १
लहानपणी आईकडून गोष्टी ऐकताना एक गोष्ट सांगताना आईच्या डोळ्यात चमक दिसायची. ती गोष्ट आता आठवत नाही पण आईच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान आणि ती चमक विसरणं शक्य नाही. ती गोष्ट होती चन्नमेची, कित्तूरची राणी चन्नमा! १७७८ साली जन्मलेली चन्नमा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चन्नमा ब्रिटीशांशी लढा देत होती.
काकती नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या चन्नमेला लहानपणीच लोकं तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. वयात आल्यावर कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना इंग्रजांचा, आपला देश घशात घालण्याचा उद्योग सुरूच होता. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं; (... दोन शतकांनंतर हिटलरने ऑस्ट्रीया, झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत जे केलं साधारण तसंच! आजच्या काळात परराष्ट्रखातं दुसर्या देशाच्या हातात जाण्यासारखंच ). राजा मल्लसर्जा यांचं १८१६ मधे निधन झाल्यावर परिस्थिती थोडी बदलली. चन्नमेने आपल्या एकुलत्या एका मुलाचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरणार होती. तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली.
पण चन्नमा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी (झाशीच्या संस्थानाच्या बाबतीत केलं तेच) दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चन्नमेच्या सैन्याने मारला. चन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दीड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबरला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला.
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे. चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्यांपैकी मी एक, आज तिला मानाचा मुजरा करते.
(सर्व माहिती आंतरजालावरून घेतली आहे.)In reply to वोक्के...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...श्री बिरुटे, हे सगळे आजही सुरू आहे. या कामाकरताच तुम्हाला संपादक म्हणून नेमले आहे. चालू द्या. पण स्वत: काय करता ते एकदा पहा म्हणजे झाले.
In reply to उद्या कशाला आजच by अक्षय पुर्णपात्रे
In reply to श्री by II विकास II
राहुन राहुन असे वाटते की राणी चन्नमाला ह्याच धाग्यात टाकायला नको होते. कुठे ती थोर राणी आणि कुठे आजकालच्या रेडवाईन पिऊन शिव्या देत माज दाखवणार्या मुली !!!.हा काय प्रकार आहे? रेड वाइनचा संबंध कळला नाही. राणी चेन्नम्मांच्या माहितीवरून त्यांचे मद्यप्राशनाविषयीचे विचार स्पष्ट होत नाही. कैच्या कै संबंध जोडू नये. शक्य असल्यास मुद्द्याला धरून उपप्रतिसाद लिहावा.
In reply to वावगेच वावगे by अक्षय पुर्णपात्रे
In reply to तुमचा वाद by II विकास II
In reply to काही मोती, मुक्ताफळे वगैरे... by श्रावण मोडक
In reply to काही मोती, मुक्ताफळे वगैरे... by श्रावण मोडक
In reply to हा उपक्रम by रेवती
कर्त्रूत्ववान स्रियांचे फोटो (जुन्या वा नव्या काळातल्या) लावायला काय हरकत आहे?नक्की आवडेल. किरण बेदी, इंदिरा गांधी यांचेही फोटो अधुनमधुन असावेत. मला व्यक्तिशः भडक मुखपृष्ठ आवडत नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to हा उपक्रम by रेवती
In reply to स्त्रीयांचे फोटो by अक्षय पुर्णपात्रे
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
In reply to इथे प्रश्न by अनामिक
In reply to इथे प्रश्न by अनामिक
In reply to >>अश्या by क्लिंटन
In reply to >>अश्या by क्लिंटन
In reply to क्लिंटन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to क्लिंटन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>अश्या by क्लिंटन
In reply to >>अश्या by क्लिंटन
सोज्वळ नसली तरी चारचौघांमध्ये बघायला लज्जास्पद वाटेल तरी नक्कीच नसतात.चार चौघांना लाज वाटली म्हणुनच तर इतके प्रतिसाद (विरोधाचे)आलेत ना?
त्यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टींचा भडीमार विविध चॅनेल्स आणि चित्रपटांमधून चालू असतो.त्याला विरोध होत नाही?? त्यावर निर्बंध घालायला काही व्यवस्था नाही? हे म्हणजे रस्त्यावर येता-जाता उकिरडा दिसतोच मग आपल्या अंगणात कचरा असला तर काय बिघडलं असं आहे!
In reply to >>अश्या by क्लिंटन
पण मी तरी मिपाला कशाची गरज आहे आणि कशाची नाही याचा विचार करण्यापेक्षा मिपावरील माझ्या आवडीचे काय ती गोष्ट मी घेतो आणि बाकीच्या गोष्टी सोडून देतोबरेच लोक असेच करतात. मिपा हे सात्विक विचारांना वाहिलेले संकेत स्थळ नाही. हे मिपाचा जन्म ज्यांना ठाउक आहे त्यांना सांगावे लागणार नाही पण नवीन लोकांना ते माहित नाही. तमाशाला येणारा वर्ग हा कधी किर्तनाला ही जातो किंवा उलट. तरी देखील किर्तन व तमाशा याचा एक सामान्य पणे वर्ग ठरलेला असतो. तमाशाला गेल्यावर मी सात्विक प्रसंग तेथे दाखवावेत असा आग्रह धरु शकत नाही, मी मिपाला बदलण्याचा आग्रह करीत नाही त्या ऐवजी मी स्वतःत बदल करतो. अशा वेळी मी उपक्रमावर जातो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
In reply to जियो क्लिंटनभाई....... by वेताळ
In reply to आजची by पक्या
In reply to पुन्हा एकदा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to 'पण जिथे by पक्या
In reply to पहिलाच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अहो पण मी by पक्या
दोन वेगळे धागे असते तर चन्नमाची माहिती ठकळ्पणे नजरेत भरली असती.हा हा हा! चन्नम्मा हे केवळ निमित्त होतं, वाभाडे काढायचे होते ते मिपाच्या खादाडी सदराचेच! ;) अर्थात, माझी आपली ही शंका बर्र का! :) तात्या.
In reply to अहो पण मी by पक्या
दोन वेगळे धागे असते तर चन्नमाची माहिती ठकळ्पणे नजरेत भरली असती.सहमत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to आदिती, लेख by स्वाती२
बाकी मिपा वरची चित्रे खटकली तरी शेवटी तो मालकांचा चॉईस असे म्हणून दुर्लक्ष करते झाले.सर्व प्रतिसादांमध्ये अत्यंत सेन्सिबल आणि वास्तववादी प्रतिसाद! धन्यवाद स्वातीजी, तात्या.
In reply to प्रकाश by Pain
स्त्रिया नव्हे, तर फोटो उत्तान असु शकतात.हॅहॅहॅ! शाळेतली प्वॉर तमाशाला जायची तव्हा आमच्या देव गुरुजींणा ते आजिबात आवडायच नाई. ते म्हणायचे अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना यांची तोंड बघा !वकायला येईन! पण प्वॉर तमाशा बघायची सोडताय होय? सौंदर्य, बुद्धीमत्ता या बाबी माजाच्या आहेत. प्रमाणीत भाषेत उन्माद म्हणू या! मिपावर तो आहे तुमची नजर च वाईट आमच्या मनात तसल काही नाही अस ही म्हण्ता येत. सेक्स इज बिटविन युअर आईज नॉट थाईज असा काहीसा सुविचार विंग्रजीत आहे अस म्हंतात ब्वॉ! बाई अंगभर वस्त्र घातलेली पण नजरा तिला विवस्त्र करणार्या असु शकतात ते कस मोजणार? ज्याच त्याला ठाउक! असो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to उत्तान by प्रकाश घाटपांडे
In reply to फोटोबद्दल by Pain
In reply to पेनरावांन by विसोबा खेचर
उद्या कशाला आजच