मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ४

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
वि.सू.: - वाचकांच्या प्रतिसादामुळे आणि काही महत्वाच्या "इनपुट्स" मुळे "अनुष्काभाभींचे येणे" पाचव्या भागावर लांबणीवर पडत आहे. तूर्तास आज एवढेच ... पहिल्या दिवशी कार्यक्रम ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीच्या वेळेसच्या अपरिमीत कष्टांमुळे व केलेल्या ओरडाओरडी व विवादामुळे काही सदस्यांच्या "घशाला कोरड" पडली होती व काहींना "थकवा" आला होता. त्यामुळे छोट्या डॉनने संध्येला आपण "कोरडे घसे ओले करण्यासाठी व थोड्या श्रमपरिहारासाठी बसूया" असा विचार मांडला. त्याला सगळ्यांनी अगदी आनंदाने संमती दिली. पण मधीच डाबिसकाकांनी "हे संध्येचे काय काढले ? पुन्हा जर माझ्या संधेचे नाव कढले तर तुला आंगठे धरून उभे केल्याशिवाय राहणार नाही." अशी धमकी दिली. त्यावर चतुरंगने मधीच "अहो डांबिसकाका, आपण संध्येला म्हणजे संध्याकाळी समजूयात" असे सांगून विषय मिटवला. समस्त महिला मंडळाने संध्याकाळी होनाऱ्या "तूफान धूमशानाची " थोडी आयडीया आल्याने "आम्ही जरा तुळशीबागेत चक्कर टाकून येतो" असे साम्गून तेथून काढता पाय घेतला. मग सगळे आपला आपला जामानिमा आवरून "बैठकीत " येउन बसले. साधारणता सगळ्या मंडळींची ३ गटात विभागणी झाली. पहिला गट म्हणजे "मद्यदूरंधर डांबिसकाका व त्यांचा शिष्यसमूदाय [ यात धमाल, आंद्या, डॉन्या, इनोबा, टिंग्या, छत्रपती, विजूभाउ, सुमारशेठ इत्यादी इत्यादी आले]." ही मंडली थोडी रगेल आणि रंगेल असल्याने त्यांनी पिण्यासाठी सापडतील ते पेले आणि सापडतील त्या ब्रँडच्या बाटल्या उचलून अणलेल्या होत्या व आरामात तिथल्याच हिरवळीवत फतकत मारली होती. बर्फाच्या व्यवस्थेआठी डॉक्टरसाहेबांनी कुठूनतरी एक बर्फाची लादी पैदा केली होती व तिचेच आता तुकडे करून ते लवकर पगळू नये म्हणून एका पोत्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते. दुसरा गट म्हणजे " एन आर आय"मंडळींचा, ह्या लोकांनी एकदम सोफॅस्टीकेटेड पद्धतीने प्यायचे ठरवले असल्याने त्यांनी येताना तिकडूनच वाईनचे पेले, बर्फाचे क्युब्स, बसायला व्यवस्थीत टेबस खुर्च्या व अंगात घालायला व्यवस्तीत ढगळ कपडे यांची व्यवस्था केली. तिसरा आणि शेवटचा गट म्हणजे "तात्या, पेठकरसाहेब, बिरूठेशेठ, संजोपराव" सारख्या "वयाने आणि ज्ञानाने मोठ्या" असलेल्या मंडळींचा. यांना आपल्या आवडीप्रमाने कुठलाही गट जॉईन करण्याची मुभा होती. शेवटी तात्यांच्या हस्ते "सिंगल माल्ट पधतीने बनवलेल्या स्कॉचची बाटली" फोडून कार्यक्रमाची सूरवात झाली. त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले. तात्यांनी आजचा हा कार्यक्रम म्हणजे फक्त श्रमपरिहार असल्याचे पुन्हा एकदा सांगून "कुणी टांगा पलटी होउन आमच्या डोक्याला झीट आणू नका" असा धमकीवजा इशारा दिला व शेवटी लवकर आवरा कारण उद्या सकाळी "अनुष्का" येणार आहे अशी सुचना दिली. पहिले काही पेग झाल्यावर औपचारिकतेची सगळी बंधने सुटली आणि मग सुरु झाल्या मोकळ्या-ढाकळ्या गप्पा. यातील काही प्रमूख अंश खालील प्रमाणे, [ वि.सू. :- मिपाच्या महिला वाचकवर्गाला व चूकून माकून येणाऱ्या सभ्य, सुसंस्कृत वाचकवर्गाला ओशाळवाणे वाटू नये म्हणून काही अस्सल कोकणी डायलॉग व काही प्रेमाचे सुसंवाद "*" च्या भाषेत देण्यात आले आहेत. दर्दी लोकांना योग्य अर्थ समजण्यास काही अडचण येणार नाही अशी खात्री आहे.] "धमालाने" बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली व ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम " केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं". धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.तुम्हीच बघा आता, तुम्ही पित नाही जे जाणून संजोपरावानी कशी तुमची घेतली. च्यायला मिपावर जगणं मुश्कील करून ठेवलं होतं. जे ते विचारतयं ' काय राव, सुमारशेठ घेत नाहीत राव' , काय रे टिंग्या, खरं ना ?" टिंग्या " एकदम राईट बोलला बघ तू, मी म्हणतो घ्याच तुम्ही शेठ. मी तर काय म्हणतो आपण दोघं पण स्मिरनॉफ चा एकएक लार्ज पेग भरू आणि डायरेक्ट संजोपरावासमोर बसू, काय ?" सुमारशेठ " नको रे बाबा. तुझं तु घे. मला आपलं स्वीट लाईम सोडा बरं" टिंग्या " अहो, हून जाउ द्यात एकदा दूध का दूध और पानी का पानी " सुमारशेठ "अरे बाबा नको, मला नाही सवय " डांबिसकाका " अरे फोकलीच्या सोड ना, तू आपलं आपलं संभाळ, सरळ बस बरं आधी , सारख त्या लोडाला मागे टेलू नको आणि भरताना सोडा सांडू नको " छोटा डॉन " टिंग्या, तेवढं लाईट्सचं पाकीट फेक बरं. अरे किती वेळ, संपव ग्लास " चित्तर "बरं , पतियाळा कोण मारणार आहे ?" आंद्या " मी आलोच बर्फ घेउन " धमाल " बरं झालं, स्वताहूनच गेलं ते, मागच्यावेळी मारला की भाउने पतियाळा आणि च्यायला आम्हाला आवरता आवरता नाकी नौ आलं " इनोबा " हा हा हा " विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे." इनोबा " बस का शेठ, हीच किंमत केली का आपली? ही तर सलामी आहे ? असली मजा तो अभी बाकी है, काय रे धमू ? " धमाल एकदम कळवळून " च्यायला धमू नका रे म्हणू, वाटॅलं तर डायरेक्ट धम्या म्हणा ..." डांबिसकाका " वा रे वा, बराच डोकेबाज दिसतोस की. आम्हाला म्हणा तुम्ही पिडा आणि तुम्हाला धमू म्हणलं की लगेच दुखाय लागलं ?" डॉन्या " अहो तसं नाही डांबिसकाका ..." मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..." आंद्या " कुणाचे ?" डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे " इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल " धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...." इनोबा " अरे गप्प बस्स म्हणतोय, तू बर्फाचे बोलतोय मी तर सोडा पाणी काहीच घेत नाही, डायरेक्ट नीट ..." डॉन्या " मी पण घेउ का ?" बाकी सगळे " हा हा हा...." डांबिसकाका " आत्ता नको. नंतर मी तूला बनवून देइन..." ************************************************************** बेसनलाडू स्वताच्या मांडीवर एक फटका मारून "डम इट, ह्या मच्छारांनी जीव नकोसा करून टाकला आहे." नंदन " येस यु आर करेक्ट, आमच्या सॅन डिएगोत तुम्हाला औषधाला पण डास सापडणार नाही. इथ तिच्यायला नुस्ता उच्छाद मांडला आहे." सर्कीट " म्हणून साहेब माणसाला 'गेंड्याची कातडी' असावी. क़ितीबी मच्छार येउदेत, आपल्याला झा* फरक पडत नाही." बेसनलाडू " हे मात्र खरं, थोदा आईस घे रे" नंदन " आपण तर यु एस ला एक मस्त समुद्रकिनारी बंगला बांधणार आहे. त्यात एक मस्त लॉन, लॉनमध्ये मस्त एक झोपाळा आणि त्यावर बसून मी मस्त वाईन पिणार." सर्कीट " विषय बदलू नकोस. तर मी काय सांगत होतो की गेंड्याची कातडी. आपलं आजकाल ह्या विषयावर पेटंट झालं आहे. मी तर विचार करतोय की भारतात जर वळू हिट होत असेल तर तिकडे गेंड्याची कातडी असे मजबूत बॅकराउंड असलेला गेंडा नावाचा पिक्चर काढायला काय हरकत आहे? होऊन जाउ दे तिच्यायला ..." बेसनलाडू " वाह, काय आयडीया आहे, परदेशात शूट झालेला एक भव्य मराठी चित्रपट गेंडा. अवघ्या दुनयेत हलकल्लोळ होइल महाराजा ..." नंदन " प्लान चांगला आहे. आपण नंतर शुद्धीत बोलू." सर्कीट " तुला काय म्हणायचे मला चढली !!! नंदन " मी असे म्हणलो नाही. फक्त म्हणालो नंतर बोलू." सर्कीट " तुम्ही कितीपण टॉन्ट मारा आम्हाला गेंड्याच्या कातडीमुळे झा* फरक पडत नाही, कारे बेसन्या ?" मग बेसनलाडू आणि सर्कीट एकमेकांना टाळ्या देत हसू लागतात ************************************************************** तात्या " काही पण म्हण पेठकरा, मस्त मौहोल जमला आहे." पेठकरसाहेब " हो ना तात्या. समाधान वाटलं बघ सगळं बघून. तु लावलेलं छोटसं रोपट आज एक मोठा वटवृक्ष बनून सगळ्यांना त्याची मधूर फळे चाखायला मिळत आहेत." तात्या " खरं आहे. हे सगळ्या मंडळींचे प्रेम आहे रे. बघ कशी मस्त मैफील जमली आहे. सुख सुख म्हणतात ते काय असतं अजून ? " संजोपरव " एकदम सौ टके की बात की है " तात्या " आत्तापर्यंत तर सगळं व्यवस्थीत पार पडलं आहे. आता उद्या "अनुष्का" आल्यावर काय होतं देव जाणे " पेठकरसाहेब " काही नाही रे. सगळं व्यवस्थीत होइल. क़ार्य सिद्धीस न्हेण्यास आई जगदंबा समर्थ आहे." तात्या " नाही, तरी पण थोडी मंडळींची काळजी वाटते आहे." पेठकरसाहेब " तु कशाला काळजी करतोस, फक्त ती आल्यावर स्वताला सावर म्हणजे मिळवलं. तुच बहीकून जाधील. आम्हालाच तुला आवरता आवरता नाकी नौ येइल." तात्या " , तू हे मला सांगतोस. मला काय माहित नाही का तु * * * * *" पेतहकरसाहेब " चिडू नको , मी फक्त सावर म्हणलं तर तु डायरेक्ट आमची ** **** काढलीस." तात्या "अरे , मला सांगतोस का ? तुझी**** न ***** ओळखतो मी." पेठकरसाहेब " बरं बाबा, तुझी ** तर **, आम्हाला काय ? काय हो संजोपराव ? " संजोपराव " पेठकर बरोबर बोलतो " तात्या " ***** *** ****, , , *, *, ** आता जर पुढे एक शब्द बोललास तर बघ" पेठकरसाहेब " च्यायला मलाच शिव्या देतोस. थांब आता तुला चांगलाच धडा शिकवतो. क़ाय समजलास, मला काय शिव्या येत नाहीत ? होय रे *, *, *, *, * !!!" तात्या " अरे च्या मारी. *, *, , * ** *" पेठकरसाहेब " * * , , *, हम " तात्या " हॅ, हे घे * * , * * ***" येवढा गोंधळ बघून सगळे आपले काय चालले आहे ते विसरून इकडे बघू लागतात. शेवटी संजोपराव या दोघांना शांत करतात तात्या " तुला बघतो नंतर " पेठकरसाहेब " जा रे, मला बघणारा आलाय मोठा, * *" हा "अस्सल कोकणी शिव्याकूट " चालूच राहतो ...... ********************************************************* तिकडे "धम्मकलाडू" बारच्या पाशी बसून जो येतोय त्याला "तुझा पगार किती , तु पितोय किती" असे सुनावून झीट आणत असतो. यामुळे चूकून विनोबांची छेड काढल्यामुळे त्या दोघांची जुंपते ..... शेवटी सगळी आवराआवरी करायची म्हणून विजूभाउ "सुपारीचे तबक आणतात" व स्वता सगळ्यांना "बास करा, ही घ्या चिमूटभर सुपारी आणि झोपायची तयारी करा" असा सल्ला देतात. आता हे तबक घेउन ते छोट्या डॉन्यासमोर येतात व म्हणतात " डॉन्या , सुपारी घे आणि आवरायच बघ बघू" डॉनचे विमान आधीच उंच उडल्यामुले तो म्हणतो " मला काही चढ़ली नाही विजूभाउ. तुम्ही मला सुपारी देता पण मला खाण्याच्या सुपारीचे व्यसन नाही कुणाचा गेम करायचा असेल तर सांगा. मी फक्त "सिगारेट" पिल्यावर तोंडाचा वास जाण्यासाठी चिमुटभर सुगंधी सुपारी तोंडात टाकतो, सिगारेट पण नेहमी पित नाही पण जेव्हा ४ मित्रांबरोबर "प्यायला" बसतो तेव्हा लागतेच. ह्याचा अर्थ मी नेहमी पितो असा नाही, जेव्हा त्याच ४ मित्रांबरोबर "३ पत्ती" खेळायला बसतो तेव्हा कोरडे बसूने म्हणून उगीच आपली "उष्टावल्यासारखी" घेतो , ३ पत्ती पण नेहमी खेळत नाही पण जेव्हा घोड्यावर लावलेले पैसे जेव्हा घूसतात तेव्हा बॅलन्स करण्यासाठी थोडे खेळावं लागतं ....तर थोडक्यात काय की, आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही ...." असं अख्खं च्या अख्खं रामायण सुनावतो. हे बोलणे ऐकत असलेल्या सर्कीटला एकदम "पत्ते खेळण्याचे " ऐकून उत्साह येतो. तो म्हणतो " ए, कोण खेळणार आहे आता बदाम सात ? माझा हूकूम बदाम" सर्कीटरावांची अवस्था ओळखून संजोपराव म्हणतात " जाउ दे शेठ, आता उशीर झाला, अंधार पडला आपण सकाळी खेळू" सर्कीट " अंधार पडला म्हणजे? आपण काय कुणला घाबरतो की काय ? आपण झा * घाबरत नसतो. लगलेच तर माझ्याकडे गेंड्याची कातडी पण आहे . चला रे आपण पत्ते खेळू. बरं पानं कोण पिसणार ???" तिकडून लगेच आंद्या " मी , मी , मी " करत पळत येतो ..... शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता " म्हणून आजचा अध्याय संपवतात….

वाचन 19695 प्रतिक्रिया 0