मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चटकदार भेळ

अरुंधती · · पाककृती
साहित्य : चुरमुरे, फरसाण (३:१ प्रमाणात असावे) बारीक शेव -खारेदाणे - तिखट बुंदी (आवडत असल्यास), कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कैरी, तिखट, चिंचेचे पाणी (चिंचेचा कोळ + गूळ + तिखट + मीठ), मिरचीचा ठेचा (थोडासा), पुदिन्याची चटणी (पर्यायी) सोबत कडक पुरी :-) एक मोठे पसरट भांडे घ्यावे. त्यात चुरमुर्‍यांत फरसाण, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिंचेचे पाणी, ठेचा इ. साहित्य घालून हाताने चांगले मिसळावे. [हाताने/ चमच्याने घोटणे तुमच्यावर....पण जेवढे चांगले, खटखट मिसळाल तेवढी चांगली चव!] देताना वरून पुन्हा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शेव पेरावी, कडक पुरी खोचावी व द्यावे. -- अरुंधती http://iravatik.blogspot.com/

वाचने 11100 वाचनखूण प्रतिक्रिया 19

शुचि 04/04/2010 - 21:53
हा हा मस्त शैली लिखाणाची. खटखट मिसळा काय अन कडक पुरी खोचा काय :) म्हटलं अरुचा लेख आहे पैसा (= वेळ) वसूलच मंगताय आणि वैसाइच हुआ!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

नितिन थत्ते 04/04/2010 - 22:38
मस्त. पाणी सुटले तोंडाला. भेळ चांगली होण्यासाठी आमच्या (निरीक्षणातून आणि अनुभवातून बनलेल्या)टिप्स... १. कांदा भेळकरण्याच्या किमान २ तास आधी चिरावा. म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो. २. मोठ्या पातेल्यात (२-३ लिटर) एकच प्लेटच्या भेळेइतके जिन्नस घेऊन ढवळावे. म्हणजे चिंचेचे पाणी, चटणी वगैरे सगळीकडे सारखे लागते. (पसरट भांड्यात/परातीत नीट ढवळता येत नाही. सांडासांड फार होते.) भेळवाला नेहमी पातेल्यात भेळ बनवतो हे सर्वांनी पाहिलेच असेल. :) ३. चुरमुरे वार्‍याने उडणार नाहीत इतपत ओले होण्याइतके चिंचेचे पाणी आणि चटणी घालावी. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by नितिन थत्ते

शुचि 04/04/2010 - 22:41
सांडासांड फार होते =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 04/04/2010 - 23:57
भेळ खायला? =)) नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

jaypal 04/04/2010 - 22:43
आवडत अस्ल्यास बटाटा आणि चाटमसाल/आमचुर वापरता येइल. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती 04/04/2010 - 22:54
शुचि, नितीन, जयपाल धन्यवाद! नितीन : टिप्स एकदम १ नंबर! :-) पातेल्यातली भेळ येकदम बेष्ट! पुण्यात आम्ही पुष्करिणी भेळवाल्या काकांना अशी भेळ बनवताना त्या पातेल्याकडे (व त्यातल्या भेळेकडे) जिभल्या चाटत पाहिलंय. जयपाल : बटाटा उकडलेला असावा ;-) हा हा हा! चाटमसाला व आमचूर... आवडत असल्यास, येस्स...पण मग चिंचेच्या पाण्याचे, कैरीचे व टोमॅटोचे प्रमाण थोडे कमी करावे लागेल. एकदम दात आंबण्याइतकी आंबट नको भेळ! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

छ्या !! आता संध्याकाळी एक भेळ खायलाचा पाहिजे, त्याशिवाय आत्मा शांत / तृप्त होणार नाही ! कोल्हापुर / सांगली ह्याभागात भडंगाचे चिरमुरे वापरुन जी भेळ बनवतात ती पण उच्चच ! पुढच्या कट्ट्याचा चकणा श्री. थत्तेच घेउन येतील ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 05/04/2010 - 14:04
चालेल. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

भेळ म्हणजे माझा अक्षरशः जीव की प्राण आहे ग अरूंधती ! आता उन्हाळा सुरू होतोय म्हणजे जास्तीत जास्त वेळा भेळ खायचे योग येणार ! अर्थात आम्ही इथल्या ऐन हिवाळ्यातही भेळ खातोच म्हणा :)

चतुरंग 06/04/2010 - 20:02
तोंडाला पाणी सुटले!! =P~ =P~ नगरचा अंबिका भेळवाला भेळेत थोडी कचोरी कुस्करुन टाकतो! वा, काय फर्मास चव येते म्हणून सांगू!! साला आत्ताच्या आत्ता जावं असं वाटायला लागलंय! (अंबिकाभेळप्रेमी)चतुरंग

In reply to by चतुरंग

विलासराव 10/09/2010 - 18:23
मस्त चटकदार झालेली दिसतेय भेळ. नगरचा अंबिका भेळवाला : काय बोलु आता. चतुरंगजी चाललाच आहात तर आपलीही एक भेळ सांगा. मी आलोच.

सुचेल तसं 08/04/2010 - 01:10
बादलीभर पाणी सुटलं तोंडाला!!!! माझ्याकडूनही एक टीपः भेळेत मटकी घातली कि अतिशय सुंदर लागते भेळ.....

Arun Powar 10/09/2010 - 16:31
भेळेचे बरेच प्रकार करून पाहिलेत घरी, पण मला कोल्हापुरातल्या "राजाभाऊ भेळ"चीच चव जास्त आवडते.