मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छोले चाट

अरुंधती · · पाककृती
करायला अतिशय सोपा, सुटसुटीत व चविष्ट पदार्थ! साहित्य : उकडलेले छोले २ वाट्या (आदल्या रात्री भिजवून - दुसर्‍या दिवशी मिठाच्या पाण्यात कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेणे) १ मोठा कांदा - बारीक चिरून २ टोमॅटो - बारीक चिरून चिरलेली कोथिंबीर फरसाण बारीक तिखट शेव तिखट बुंदी, तिखट दाणे (पर्यायी) चाटमसाला तिखट लिंबाचा रस (पर्यायी) हिरवी (पुदिन्याची) व चिंचेची चटणी दही (पर्यायी) पुदिना चटणी : पुदिन्याची पाने, कोथिंबीर, मीठ, साखर, मिरची (पर्यायी) एकत्र मिक्सरमधून काढणे. चिंचेची चटणी : चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट एकत्र करावे व व्यवस्थित मिसळावे. कृती : उकडलेल्या छोल्यांना प्लेटमध्ये घालावे. त्यावर वरील सर्व साहित्य एकेक करून घालत जावे. व्यवस्थित मिसळावे. ताबडतोब फडशा पाडावा. इतर पर्याय : छोल्यांऐवजी हिरवे मूग, चवळी असे पर्यायही वापरता येतात. सर्व तयारी केल्यास अतिशय झटपट होणारा, पोटभरीचा व रुचकर असा हा पदार्थ.

वाचने 5949 वाचनखूण प्रतिक्रिया 6

वाहीदा Mon, 03/29/2010 - 18:19
खुप सपाटून भूक लागली .. नंतर करून बघते पण आधी कंटीनमध्ये जाऊन फडशा पाड्ते रेसिपी छान !! भूक सपाटून लावली ईतकी छान मस्त ! मस्त ! मस्त ! ~ वाहीदा

झुम्बर Sat, 04/17/2010 - 13:40
या रविवरि नक्कि करनार............... कशि होतेय सन्गेनच फोतु सकत :)