..... पुन्हा पुन्हा !
लेखनविषय:
दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा
चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा
माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा
जयश्री
वाचने
1949
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
वाचुनी आनंद झाला पुन्हा पुन्हा
कमाल आहे या गझलेची वाचतो ती पुन्हा पुन्हा... ;)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
एक वेगळीच कविता!
सुंदर..
तात्या.
In reply to एक वेगळीच by विसोबा खेचर
अगदीच वेगळी कविता! :)
चतुरंग
In reply to + १ खरंच आहे! by चतुरंग
+१
मात्र हा शेर [+ रचनाबंध] कळला नाही :
माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
छान कविता. मी पण परत परत वाचली.
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा
मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
अप्रतीम! जयश्रीताई, क्लास रचना!
उशीरा वाचली.. रंगदांचे विडंबन बघून आलो इकडे!
चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा
या ओळी खास! विशेष आवडल्यात.
येऊ देत अजून.
राघव
वाचुनी