हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स
सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे.
हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत.
व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे. फिगर स्केटिंग आणि स्किईंग हे त्यातल्या त्यात मला खूप आवडले.
(फेब २० - २१ )शनिवारी आणी रविवारी फिगर स्केटिंग ही स्पर्धा झाली. त्यात ओडी आणि एफ डी असे दोन प्रकार असतात. ओडी म्हणजे ओरिजिनल डान्स आणि एफ डी म्हणजे फ्री डान्स. अमेरिकेचे फिगर स्केटिंग मधील राष्ट्रीय विजेते मेरिल डेविस आणि चार्ली व्हाईट ह्या जोडीने ओरिजनल डान्स ह्या प्रकारात हिंदी चित्रपटातील गाण्यांवर बर्फावरील नृत्य सुंदर रित्या सादर केले. हिंदी गाण्यांमधे त्यांनी कजरारे , सिलसिला ये प्यार का आणि डोला रे डोला ही गाणी निवडली होती. त्यांचे कपडे पण गाण्याला साजेसे होते. हे नृत्य इतके छान झाले की ह्या स्पर्धेचे ते एक वैशिष्ठ्य ठरले. ह्या प्रकारात ह्या जोडगोळीने बाजी मारून १०८.५५ गुण पटकावले जे इतर स्पर्धकांपेक्षा सर्वात जास्त होते. नंतर मात्र फ्री डान्स मध्ये अगदी थोड्याशा चुकींमुळे त्यांचे गुण कमी झाल्याने कॅनडाची जोडी पुढे सरकली. मेरिल डेविस आणि चार्ली व्हाईट यांना रौप्य पदकाचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.
ह्या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण मला पाहता आले नाही. पण संध्याकाळच्या बातम्यांमधे त्यांच्या नृत्याची झलक बघायला मिळाली. संपूर्ण नूत्य बघायला हवे ह्या हेतूने जालावर नृत्याचा व्हिडिओ शोधला. छान वाटले बघायला. ऑलिंपिक मधे हिंदी गाणी वाजवली गेली ह्याचे कौतुक वाटले.
मिपाकरांना आवडतोय का बघा हा व्हिडिओ >व्हिडिओ
http://www.nbcolympics.com/video/assetid=e713aa15-112f-4d1c-8665-77bec00aa9f1.html#daviswhite+rise+second+place
वाचने
4930
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
यप! बघितला
छान आहे
क्लासिक
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मस्तानी
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मस्तानी
हा विडीओ
In reply to हा विडीओ by लंबूटांग
कोणता
In reply to कोणता by पक्या
होय
काय सुंदर
बरोबर आहे तुमचं ...
In reply to बरोबर आहे तुमचं ... by मस्तानी
होsssssssssssss
In reply to बरोबर आहे तुमचं ... by मस्तानी
होsssssssssssss
In reply to होsssssssssssss by शानबा५१२
अश्विनिका
जग कुठे...... GoodFellas..........
In reply to जग कुठे...... GoodFellas.......... by शानबा५१२
म्हणजे................
In reply to म्हणजे................ by शानबा५१२
जग खूप जवळ
मलाही
न्यूज
कमाल आहे तुमचि