मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कविते, हे तर तुझेच देणे..!)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माताय! असला लॉलीपॉप हाफवॉली मिळाल्यावर काय करावं बरं म्या पामरानं? ;) वेळी अवेळी, कविता भाळी परज लेखणी नवी नव्हाळी ओळ ढोबळी, सूर पाघळी तळमळणार्‍या 'जालो'माळी पिसे कवीला, वेड जनाला झुळझुळ कोरा, कागद ओला कोण मेंबरा, उगा हासला तीट लावतो काव्या मेला शब्दढोकळा सहस्र माळा वाचक मेळा, रोज आगळा बर्‍याच वेळा, त्याचत्या कळा दंग लेखणी, शब्द पांगळा गारठलेली, जनता ल्याली पुन्हा विडंबन, भर्जरि शाली ग्लेनफिडिचची मैफ़ल सजली 'पूनम'वरच्या, भव्य महाली अस्सल बेणे, रंग उधळणे, ढासू गाणे, चिकन तोडणे 'चतुरंगाचे' शब्द गुंफ़णे कविते, हे तर तुझेच देणे..! चतुरंग (खुद के साथ बातां : आम्हाला 'कविता कसली अढळ वस्तरा, साफ दुहेरी कल्ले कटले!' ह्या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली! ;) )

वाचने 3412 वाचनखूण प्रतिक्रिया 15

शेखर Mon, 02/08/2010 - 23:21
अर्ध्या तासात विडंबन? अशक्य आहात रंगाशेठ.... बाय द वे: पुनम मध्ये ग्लेनफिडीच मिळते का?

In reply to by विसोबा खेचर

शेखर Tue, 02/09/2010 - 00:18
बाय द वे, पूनम कुठे आहे? रंगाशेठ ना अभिप्रेत असलेले पुनम पुण्यात जंगली महाराज रोड वर आहे.... (तेच अभिप्रेत असेल तर)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शुचि Tue, 02/09/2010 - 03:52
ढासू गाणे ..... ल्लय झक्कास शब्द .....वाह वाह!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विजुभाऊ Tue, 02/09/2010 - 09:48
शब्दढोकळा सहस्र माळा वाहवा......मी कितीतरी दिवस विचार करत होतो की गुजराथी खाद्यपदार्थ कवितेत कसे आणावेत. रंगाशेठ. आता उंधियो / फाफडा / खमण / खाखरो /हांडवो / थेपला हे पदार्थ सुद्धा वाट पहाताहेत तुमची कवितेत येण्यासाठी

उदय सप्रे Tue, 02/09/2010 - 10:39
चतुरंग साहेब ! आता आम्हाला असे म्हटले पाहिजे : रसिक येऊदे काव्य चारोळी अथवा कधी आरोळी लगेच करुया इनोदबुद्धिने आपुन त्याची खांडोळी हात तोडतो , टांग मोडतो , तडफडशी जनू मासोळी ; चतुरंग उभा , ललकारी सभा , अन् मिपा जाहली दंग ! हे कडकड टाळी वाजती वाचकांच्या वाहवाची अन् खुसखुस होते मूळ कवीच्या दादीची वाहवाची जमवून असे साहित्य झोडतो , हीच इनंती यावं जी कवितेचं दान द्यावं जी , हे यावंजी , शब्दावर ध्यान द्यावं जी , हे यावं जी कवितेचं दान द्यावं जी...्ए हे हे हे हे हे हे हे ! उदय सप्रे

मेघवेडा Tue, 02/09/2010 - 15:10
लॉलीपॉप हाफव्हॉली भिरकावून दिलाय प्रेक्षकांत!!! सणसणीत!! रंगाशेठ, मजा आली!!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

सुधीर काळे Tue, 02/09/2010 - 15:44
तात्यांनी चुकीचा प्रश्न विचारला! त्यांना त्यांची आवडती ग्लेनफिडिच कुठे आहे असे विचारायचे होते. पण "लेकी बोले, सुने लागे" या न्यायाने त्यांनी ’पूनम’ची चौकशी केली! तरी ग्लेनफिडिच कुठे आहे हे कळविणे. (मलाही तसा इंटरेस्ट आहे हं!) कविता छान आहे. काव्य सुचतं तरी कसं बुवा? आपुनको आताइच नहीं! अवांतर: तात्या नेहमी प्रत्येक खाद्यपदार्थ कुणातरी अफलातून नटीबरोबर खायचा सल्ला देतात. ग्लेनफिडिच कुणाबरोबर, तात्या? ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!