मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राँस् पालक

गणपा · · पाककृती
पालक पनीर हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा आणि सर्वत्र आवडीने खल्ला जाणार पदार्थ. पण मला स्वत:ला पनीर जास्त आवडत नाही त्यामुळे आज यात थोडा फेरफार करुन याची नॉनव्हेज आवृत्ती केलेली. साहित्य : १ जुडी पालक १५ - २० मोठ्या कोलंब्या २ चमचे आल+लसुण पेस्ट १ चमचा मालवणी मसाला १ मोठा कांदा बारीक चौकोनी चिरलेला २ चमचे गरम मसाला मीठ चवी नुसार २-३ चमचे तेल लिंबाचा रस कृती : पालक नीट धुऊन घ्यावी. एका मोठ्या भांड्यात पाणी घालून त्यात २-३ चम्चे लिंबाचा रस टाकुन पालक शिजवून घ्या. (शिजताना वर झाकण ठेवु नये. पालकचा हिरवा रंग काळपट होतो.) पालक ७-८ मिनीटात शीजते. थोडया वेळाने गार झालेली पालक मीक्सर मध्ये घालून पेस्ट करा. पालक शिजतेय तोवर कोळंबिला आल+लसुण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ, लिंबाचा रस लावुन मुरत ठेवा. एका भांड्यात २-३ चम्चे तेल घेउन त्यात कोळंबी २-३ मिनिटे परतवुन अर्धवट शिजवुन घ्यावी. आणि वेगळी काढुन ठेवावी. त्याच भांड्यात नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवावा. कांदा गुलाबी झाला की त्यात २ चमचे गरम मसाला टकुन चांगला परतुन घ्यावा. खाली लागत आसल्यास किंचीत पाणी घालाव. बाजुने तेल सुटुलागल्या वर पालकची पेस्ट त्यात टाकावी. मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवल्यावर त्यात कोळंबी टाकावी. मीठ चवी नुसार घालाव . ( मीठ जरा बेताने घालाव कारण पालक मध्ये क्षारांच प्रमाण बरच असत. ) मंद आचेवर ४-५ मिनीट शिजू द्या. शीजताना झाकण ठेउ नये. गरमा गरम भाता बरोबर किंवा चपाती, भाकरी बरोबर हा प्रकार भन्नाट लागतो.

वाचने 8406 वाचनखूण प्रतिक्रिया 12

अश्विनीका 25/01/2010 - 13:16
काय योगायोग .. मी कालच सेम हीच डिश बनवली होती. आणि आज तुमची रेसिपी बघतेय. माझ्या रेसिपीत मी मालवणी आणि गरम मसाला न घालता काळा मसाला व धने जिरे पूड घातली होती. आणि पालक शिजताना त्यात एक छोटा टोमॅटो आणि १-२ छोट्या हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. अशी प्रॉन्स घातलेली पालक भाजी फार छान लागते . - अश्विनी

चिरोटा 25/01/2010 - 15:51
भाकरी बरोबर तर मस्तच लागेल. या आठवड्यात नक्की करतोच. भेंडी P = NP

सुनील 25/01/2010 - 17:07
अप्रतिम!! शिजलेल्या पालकात थोडे आरारूट घातले तर Consistency येईल असे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर 25/01/2010 - 17:29
छान दिसतोय पदार्थ अन् सोपाही ... वरती म्ह्टल्याप्रमाणे १ टोमॅटो प्युरी करून घातला तर अजून छान लागावा.

In reply to by संदीप चित्रे

चित्रा 26/01/2010 - 05:15
प्रॉन्स जोडीला असल्या की पालक, मेथी वगैरे प्रकारही खाणेबल होतात हा माझा अनुभव. असहमत. यातून कृपया मेथीला वगळावे. :) मेथी कशीही चांगलीच लागते. माझी सर्वात आवडती भाजी.

श्री गणपा, मस्त पाकृ. जमण्यासारखी दिसतेय. ........................ I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

प्रभो 26/01/2010 - 23:20
भूक लागली...बाकी विकांती प्रॉन्स पुलाव हाणला मैत्रिणीने बनवलेला. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी