इंडो चायनीजच्या पुढच्या भागात सर्वांच स्वागत.
आपण बाहेर गेलो की मुख्य जेवणा आधी स्टार्टर म्हणुन सुप मागवतो. पण खर तर सुप म्हटल की ते एक संपुर्ण (complete food) अन्न आहे.
तर आज पाहुया असच एक चटपटीत सुप.
यात चिकन च्या ऐवजी भाज्यांचा स्टॉक वापरल्यास हिच कृती शाकाहारी प्रेमींसाठी
चालेल.
साहित्यः
१/२ किलो चिकन १/२ ते ३/४ लिटर पाण्यात १५ मिनिटे मोठ्या आचेवर उकडत ठेवा.
चिकनचा स्टॉक नसल्यास पाणी.
भाज्यांचा स्टॉक बनवण्या साठी चिकन ऐवजी कुठल्याही भाज्या वापरु शकता.
गाजर, भोपळी मिरची, कोबी, हिरवी मिरची, आल, लसुण, पातीकांदा बारीक चिरुन.
१-२ चमचा सोयासॉस, १-२ चमचा चिली सॉस.
१ अंड फेटुन.
१-२ मोठे चमचे मक्याच पीठ. (कॉनफ्लॉवर).
चवीनुसार मीठ.
कृती:
उकडलेल्या चिकनचे लांब लांब तुकडे करुन घ्या.
एका मोठ्या भांड्यात तेलावर हिरवी मिरची आल लसुण आणि चिकन परतुन घ्या.
त्यात २ चमचे सोयासॉस टाकुन बाकीच्या भाज्या मोठ्या आचेवर परतुन घ्या.
जितक सुप बनवायच आसेल त्याप्रमाणात स्टॉक/पाणी टाकाव आणि चवीनुसार मीठ टाकाव.
सुपला एक उकळी आली की मग एक वाटीत थोड पाणी घेउन कॉनफ्लॉवर त्यात मिसळवुन सुप मध्ये टाकाव.
सुपची घनता लगेच वाढते.
परत एक उकळी आली की मग फेटलेले अंड चमच्याने थोड थोड (थेंब थेंब) टाकाव. एकदम टाकु नये.
वाटल्यास चहा गाळणीचा वापर करु शकता.
गरमा गरम सुप जेवणाच्या आधी तयार आहे.
वाचने
17224
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आ हा...हा...
>>हाटीलात
In reply to आ हा...हा... by मदनबाण
>>कडक
In reply to आ हा...हा... by मदनबाण
शाकाहारी
हो, चालेल
In reply to शाकाहारी by मोहन
हुह्ह्ह्ह
गणपा
मस्त दिसतय
स्वाती ताई
In reply to मस्त दिसतय by स्वाती२
ये चिज बडी
गणपा......
>>या सुपची
In reply to गणपा...... by jaypal
सुर्ररररर
क्षमा कर...!
गणपा भाऊ......
पालकच सुप
In reply to गणपा भाऊ...... by खादाड_बोका
क्लास! गणपा
अंड टाकायच
In reply to क्लास! गणपा by प्राजु
क्या बात है गणपाशेठ!!
रंगाशेठ
In reply to क्या बात है गणपाशेठ!! by चतुरंग
सॉर चव कशाने येते?
सोयासॉसने
In reply to सॉर चव कशाने येते? by वेदनयन
गरम सुप
अरे वाह
In reply to गरम सुप by मीनल
सर्व वाचक,
आफरीन !!