Skip to main content

'खरेसाहेब माफ करा : २ : एवढंच ना?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 06/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एवढंच ना? विडंबन करू... एवढंच ना? आमचं हसं, आमचंच हस्सं... X( , घेऊन कागद एकटेच लिहू, एवढंच ना? मत्त्याला कोण? मतल्याला कोण? गझलेला अवघ्या वाचतय कोण? शब्दाला शब्द, प्राचीला गच्ची, यमकाला यमक जुळवत लिहू, एवढंच ना? कवितेला मिटर होतंच कधी? काव्याला व्याकरण होतंच कधी? शब्दांचे सोस, यमकाचे कोश, तिरकस प्रतिसाद अनुभवत लिहू, एवढंच ना? वाचलंत तर द्याल, तुमचीच 'राय' , टाळलंत तर टाळाल, आम्हाला काय? स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू, एवढंच ना? काव्याच्या छंदा, लिहिण्याचा धंदा, लिहीत राहू कुणी वंदा वा निंदा, काव्याच्या छंदा, कवितेचा धंदा, विडंबन करून जगतोय बंदा, विडंबन खरे, विडंबन बरे...., सगळ्यांच्या खोड्या काढीत लिहू, एवढंच ना? नवईडंबनकार ईरसाल 'खोटे'
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3730
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त विडंबन. आणखी येऊ देत. - ओंकार.

मस्तंच लिहीतात संदीप साहेब... चाल लावून वाचले :) आणि संदिप खरेही एक बरा कवी आहे. पण तो पेटी बडव्या सलील कुलकर्णी लै डोक्यात जातो. असो ! आपण कवितेचं एक कडवं इकडे लिहून बाकी पुर्ण कविता आपल्या ब्लॉग वर लिहीत जा .. आणि त्याची लिंक इकडे देत जा :) बरं पडतं ते हल्ली :) - टारकंती अनलिमीटेड

स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू, एवढंच ना?
झकास! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

झकास विडंबन!

मस्त...

अजून येऊ द्या. :) -दिलीप बिरुटे

ईडंबनाला काही तरी प्रेरना लागतेच ना! ती खरे साहेबच हायेत का अन्य कोनी? ईडंबन बाकी झकास पाडलय ब्वॉ! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

छान!!! बिपिन कार्यकर्ते

तुम्ही नेहमी "खरेसाहेब माफ करा" या शीर्षकानेच लिहिता? उगाच क्रमशः लिहिल्यासारखे वाटते

In reply to by विजुभाऊ

कवितेचे नाही... सद्ध्या चालवलेल्या विडंबनसत्राचे. कारण सद्ध्या टार्गेट संदीप खरे आहे. तुम्हाला आवडले नसेल तर " यापुढे इजुभौ माफ करा..." असे नाव देइन.. कस्सं? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"