खरेसाहेब ......., माफ करा !
लेखनविषय:
काव्यरस
(आमी बी पाडलं.... >:) )
आता पुन्हा
कुणीतरी विडंबन करणार ....
आता पुन्हा, आम्ही डोक्यावर हात मारणार
मग आम्ही संगणकासमोर बसणार
मग कुणीतरी खवत खरड टाकणार
मग आम्ही अजुनच वैतागणार
तरिही खरडी कमी नाही होणार
काय रेsssss देवा .....
विडंबन बघुन आम्ही पेटणार
उगाचच खोड्या काढता, ओरडणार
मग संपादकाकडे दाद मागणार
मग एक ओळीचे धागे काढणार
मग संपादक आमचा अनुल्ल्लेख करणार
मग आम्हीही खरडी वाढवणार
संपादकांच्या नावाने खडे फोडणार
तरिही संपादक नाही ऐकणार
पुन्हा विडंबनाचा मुड नसणार
मग प्रतिसाद देणे बंद करणार
मग आम्ही अनुल्लेखवाले ठरणार
पुन्हा आमच्यावर चर्चा होणार ...
पुन्हा कुणीतरी विडंबन करणार....
काय रेsssss देवा......
पुन्हा सुरुवातीपासुन मिपा चाळायचे ठरवणार
पण मग ते काही केल्या नाहीच जमणार
मग एखादी जुनीच कविता टाकणार
मग आमची चोरी पकडली जाणार
मग परत ते आम्हाला चिडवणार
मग आम्ही त्यांना कंपुबाज म्हणणार
मग ते 'जी' लावुन आमची तासणार
मग पुन्हा नवीन विडंबन करणार
काय रे sssss देवा ......
हे असेच चालायचे
विडंबने कालही होती... आजही होताहेत..., उद्याही होणार...!
काय रेsssss देवा .......
(नव इडंबनकार ईरसाल 'खोटे' ~X( )
वाचने
3999
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
लै भारी
हे असेच चालायचे विडंबने कालही होती... आजही होताहेत..., उद्याही होणार...! काय रेsssss देवा .......हॆहॆहॆ! समदी हाक द्यवाच्या नावानी! अरे देवा! (नास्तिक) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
काय हे विशल्या...यु टु? _/\_
सही आहे..... पोट प्रकार "भयानक" रस !!!! अफलातून...
श्री रा रा विशालजी कुलकर्णीजीसाहेब
विडंबन प्रांतातल्या पाडापाडीत आपले पहिले पाउल दमदार पडलेले असुन ज्यांच्यावर आहे त्यांनी नक्कीच "अरेऽऽदेवारे" असे उद्गार काढले असतील याची खात्री आहे. यानिमित्ताने तुम्हाला "देवऽऽपावला" हे नक्की. आपण अशी अनेकानेक विडंबने पाडावीत अशी देवापाशी प्रार्थना.
धन्यवाद.
--अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
कस्चं कस्चं....
भगवन, आपले आशिर्वाद पाठीशी असता काय कमी आहे? पाडू... अजुन पाडु.... ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
लै भारी विशाल सेठ...
मस्तच विडंबन
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
विशालभाऊ आपले शब्द फार हसीन आहेत त्याना विडंबनाच्या जमिनीवर नका उतरवू मैले होतील. आणि मग तुमची बदनामी पण तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुमचा पाठ्लाग करत येईल.
कविता आवडली हे वे सां न ल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
निखिलभौ धन्यवाद...
श्रीमंत.... आपली आज्ञा शिरसावंद्य ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
लै भारी