Skip to main content

मसाले भात

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 10/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २ वाट्या बासमती तांदुळ, १/२ वाटी कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लवंगा,२/३ तमालपत्री, १०/१२ काजू तुकडे, चिरलेला कोबी १ वाटी ,गाजराचे तुकडे एक वाटी, मोठे २ चमचे गोडा मसाला, चवीपुरते मीठ, २ मोठे चमचे तेल, १ मोठा चमचा तुप, राई, जीरे, हळद, हिंग,आले १ इंच उकललेले पाणी तांदळाच्या अडीचपट कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा. एका कढईत २ चमचे तेल गरम करून मोहोरी,जीरे,हिंग, हळद, काजू, लवंगा, मिरे, तमालपत्री घालून कोबी आणि गाजर घालुन परतुन घ्यावे नंतर त्यात तांदूळ घालुन परतून घ्यावे. तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.आले किसुन घालावे, बारीक गॅसवर उकळी काढावी.मग त्यात गोडा मसाला, चवीपुरते मीठ घालावे. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ काढावी. भात शिजत आला की त्यात चमचाभर तुप सोडावे त्यामुळे भाताची शिते मोकळी राहतात. खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ कोथिंबीर घालुन घ्या.

वाचने 10665
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by माधुरी दिक्षित

अग डिशमधला फोटो सापडलाच नाही ग असाच पाठवुन देते

In reply to by माधुरी दिक्षित

आर्धीच डीश पाठवतोय एकीकडुन गणप्या आणि एकीकडुन ही श्रद्धा ( परत एकदा "आले पाचक" बनवाव लागेल) मसाले भत जबराच

माझ्या सासुबै छान करतात मसालेभात ;;) चुचु

वा वा छान छान ! घोसाळ्याची भजी ! मसाले भात.. आता कढी, मठ्ठा, बुंदिचे लाडु सगळं येवु द्या.. सगळं कसं लग्नाच्या मेजवानीत आल्यासारखे वाटते. नव्या संपादकांना खाउ पिवु घालुन फितवणं चांगलं चालु आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

अप्रतिमच !!! दुपारच्या वेळी पाकृचा विभाग उघडु नये हेच खरे. अवांतर :- नान्या तु लग्न कर आता, मस्त जेवणावळ घालु आपण ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

माझी मामी मस्त करते मसालेभात एकदम त्याचीच आठ्वण झाली.

मस्त.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

स्स्स्स्स्स्स्स...मस्तच! गणपाचा क्यामेरा कुठला आहे ते विचारुन घ्या एकदा.