एअर ट्रॅफिक कंट्रोल
तीनेक वर्षांपुर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्या सिस्टीमच्या एका छोट्या भागाचा अभ्यास करण्याचा योग आला होता. त्यावेळी जवळ-जवळ हजार पानांइतके स्पेक वाचायची, त्या गंजीतून सुई शोधून काढायची कामगिरी टाकण्यात आली होती.
येथे मी लिहिणार आहे ते त्यातील काही मनोरंजक गोष्टींबद्दल, ज्या आपल्या सर्व-सामान्यांच्या आयुष्यात अनेकदा कळत-नकळत प्रवेश करतात. किंबहूना मी असे म्हणेन की, ह्यांच्या शिवाय आपण विमानप्रवास सुखरुप करुच शकणार नाही व विमानप्रवास जरी केला नसेल तर आजपर्यंत आपल्या डोक्यावर भरकटून (सहजा-सहजी) एखादे विमान का आदळत नाही हे समजायला ही माहिती उपयोगी ठरावी. [ही संदेश प्रणालीचा संबंध सिक्रेट एन्क्रिप्टेड मेसेजशी अजिबात नाही]
एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम एक काटेकोरपणे तयार केलेली संवादप्रणाली आहे. विमानं, हेलिकॉप्टरं, जहाजं ह्यांना एकमेकांशी तसेच नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहण्यात तसेच सुचनांची देवाण-घेवाण करण्यास उपयोगी पडेल अशी ही प्रणाली वर्षानुवर्षांच्या अनुभवातून (गंभीर चुकांमधून धडे व बोध घेतघेत) तयार झाली आहे.
ह्याचा एक भाग म्हणजे प्रत्येक विमानं, ई ना विशिष्ठ नावे देणे- ह्याची पद्धत प्रत्येक देशासाठी ठरवण्यात आली आहे.
दुसरा भाग एकमेकांशी संवाद साधतांना जी उपकरणं वापरतात त्यांच्या प्रमाणीकरणाबद्दल बोलतो- रडार, रेडिओ फ्रिक्वेन्सी, ई,
तिसरा भाग, संवाद काय साधायचा. हा सगळ्यात क्लिष्ट भाग आहे. त्यातील एक प्रकार आपल्या अगदी ओळखीचा आहे. जेव्हा दोन व्यक्तिंना (एक जण नियंत्रण कक्षातला व दुसरा विमानातला) एकमेकांशी प्रत्यक्ष बोलायची वेळ येते तेव्हा ते "आल्फा, बीटा.." असे संबोधन ए, बी,... साठी करतांना आपण ऐकले असेलच. जगभर हेच कॉलसाईन वापरले जातात. त्यांचं बोलण अत्यंत अचूक, खात्रीशीर व्हावे ही त्यातील कल्पना असते. व्यक्तिंना एकमेकांशी बोलण्याची वेळ शक्यतो टाळली जाते, हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसते कारण ऐकण्या-सांगण्यात होणारा फरक. त्यामुळे जास्तीत-जास्त मदार संगणकीय संवादावर असते. जेव्हा दोन संगणक एकमेकांशी बोलतात व ते त्यातील अर्थ काढून वैमानिकाला सांगतात [आणि त्या उलट], तेव्हा अचूक संवाद साधला जातो.
मिलिटरीसाठी प्रत्येक देश आपापली संदेश प्रणाली करु शकते किंवा ते शक्य नसल्यास नाटो सारख्या संस्थेचे सभासद्स्यत्व घेऊन त्यांची प्रणाली वापरु शकते. तसेच नौदल, वायुदल, भूदल ह्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी तिघांचीही संदेश प्रणाली एकमेकांना पाठवलेले संदेश उलगडून दाखवण्यात वाकबगार असणे आवश्यक असते. (अमेरीका व्हियेतनामच्या युद्धात जे काही शिकली त्यात हे एक महत्वाचे शिक्षण होते).
पुढे, प्रत्येक विमान रडारच्या कक्षेत असेल तर व बाहेर असेल तर त्यातही कसे संदेश द्यायचे-घ्यायचे त्याचे प्रकार ठरलेले आहेत. एकदाका रडारच्या कक्षेत आले की, त्या विमानाला एक विशिष्ठ पध्दतीने ट्रॅक केले जाते- त्या विमानाचा त्यावेळी अवतीभवती असलेल्या इतर विमानांशी अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या सतत संपर्क साधणे (संगणकाद्वारे), व वैमानिकाने तो संदेश ग्रहण केला ह्याची नोंद ठेवणे, त्याचे तंतोतंत पालन केले गेले की नाही ह्याची नोंद ठेवणे असे अनेक कामं संगणक बिनबोभट करत असतो.
जर नियंत्रण कक्षाला वैमानिका सांगायचे असेल की, तू आता उतरायला सुरुवात कर, अमुकएक अल्टीट्युडला ऊड, तर ते अशाच "भाषेत" नियंत्रण कक्षाच्या संगणकातून विमानातील संगणकाला पाठवले जाते. तो संगणक त्याचे भाष्यांतर करुन वैमानिकाला कळेल अशा भाषेत त्याच्या पटलावर तो संदेश उमटवतो असे गृहीत धरु. [दोन ड्रायव्हर जसे रस्त्यात भेटले की, ट्र्क मधेच थांबवून खबरबात करतात तसा प्रकार येथे नसतो. नाहीतर, नियंत्रण कक्षातील नियंत्रक, "काय रे, पक्या कसा आहेस, आईने पाठवलेला गाजराचा हलवा मधेच संपवला तर नाही ना? (वाचक आपापले व्हरीएशन येथे टाकू शकतात)" अशा गप्पा मारत असतांना दुसरी दोन विमान एकमेकांना धडकली हे सुध्दा कळणार नाही]
[किंवा अचानक रडारवर नवे विमान दिसले तर, कंट्रोलर रेडिओ घेऊन, "कोण आहेस रे तू, काय काम काढलंस इकडे?" "अरे, मी तुझ्या पुण्याच्या मावशीचा विनय, आलो आज इकडे ड्युटीवर". "अरे, तू आहेस होय, मला वाटलं की कोण आलं". असे संभाषण न होता, विमानाच्या "आयडेंटीफाय", "फ्रेंड ऑर फो" अशा स्वरुपाच्या सुचना कशा पाठवायच्या ह्याचे एक स्पेक असते. तसेच विमान ह्या संदेशांना कशी उत्तरे देईल, म्हणजे ती इथल्या संगणकाला कळतील ह्या सगळ्या गोष्टी ठराविक पध्द्तीनेच पार पाडाव्या लागतात.]
तिसऱ्या भागाबद्दल बरेच बोललो आता रटाळ व्हायच्या आत थांबतो. पण हा विषय इतका मोठा आहे की, एकदा त्याबद्दल वाचायला घेतलं ह्या विषयातील खोलीबद्दल आश्चर्य वाटतं.
चौथा भाग आहे तो नियंत्रकांना प्रशिक्षण कसे द्यायचे, त्यांचे वय काय असले पाहिजे, निवृत्त केव्हा व्हायला पाहिजे अशा नियमांचा.
अशा सिस्टीम जर डेव्हलप (विकसित) केल्या तर त्या टेस्ट कशा करायच्या हा ही एक गुंतागुंतीचा विषय आहे. टेस्टींगच नव्हे तर सिस्टीमचा वापर करतांना छोटीशी चूकही झाली तरी भयंकर विध्वंस ठरलेलाच असतो त्यामुळे प्रत्येक संबंधीत व्यक्तिंवर प्रचंड दडपण असते.
एखाद्याला ह्यात करीयर करायचे असेल तर त्या-त्या पातळीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अमेरीकेत तसेच युरोपात आहेत. भारतात आहेत की नाही माहित नाही.
वाचने
5992
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
काय राव ?
In reply to काय राव ? by jaypal
हेच
धन्यवाद ...
In reply to धन्यवाद ... by संग्राम
दिवस-रात्र
In reply to दिवस-रात्र by अजय भागवत
Airplanes seen from space
Airplanes seen from space satellite - Watch more Funny Videos
महत्वाचे
चांगली माहिती
In reply to चांगली माहिती by अक्षय पुर्णपात्रे
ग्लॅडवेल
मनोरंजक
In reply to मनोरंजक by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी हेच
In reply to अगदी हेच by अभिज्ञ
हेच म्हणतो.
एअर ट्रॅफिक कंट्रोल
एअर ट्रॅफिक कंट्रोल
हो पण
तीनेक
चांगला लेख
चांगली..
एका
आवडला !
मला
वेगळा विषय..
एक वेगळ्या
जाणकार लोक माहिती द्या
In reply to जाणकार लोक माहिती द्या by संग्राम
संग्राम,
In reply to संग्राम, by अजय भागवत
धन्यवाद
जुन्या आठवणी