शेझवान
साहित्य : आलं ( एकदम बारीक चिरून ) , लसूण ( एकदम बारीक चिरून ) ,
हिरवी मिरची ( एकदम बारीक चिरून ) , सेलरी पानं , सोया सास , चिली सास , मीठ , तेल
लाल तिखट.
कृती : एका कढई मधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं आलं व लसूण टाकून चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यावे , मग त्यात बारीक चिरलेली मिरची टाकून पुन्हा परतावे.
व्यवस्थित परतल्यावर त्यात लाल तिखट घालून अजून २ मि. ढवळावे. मग त्यात सोया व चिली सास घालून एकजीव होईपर्यंत ढवळावे.चांगले रटरटल्यावर त्यात बारीक चिरलेली सेलरी घालून एकदा नीट एकजीव करून उतरावे.
गार झाल्यावर चायनीज रोल , स्प्रिंग रोल इ. चायनिज पदार्थांबरोबर सर्व्ह करावे .
हे किमान ७/८ दिवस फ्रिजमधे न ठेवता टिकते.
( लाल तिखट व चिली सास ची मात्रा प्रत्येकाच्या तिखटाच्या आवडीप्रमाणॅ ठेवावी. सोया सास ही फार घालू नये आंबट होईल. )
वाचने
7118
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
ह्याचा ठसका खुप वाईट आहे.
धन्यु रे
धन्यवाद.
अरे वा...कधीपासून ही रेसीपी
In reply to अरे वा...कधीपासून ही रेसीपी by जयवी
या धाग्यात मिळेल.