मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोलताना का सुचेना..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! पायवाटा त्याच त्या की, चालते मी तीच ती तीच माझी पाउले अन त्याच त्या खाणाखुणा.. सांगताना थांबते मी त्या तिथे पुन्हा पुन्हा भासते का नित्य तेथे तीच शब्दऽ वंचना.. घाव ते ही ओळखीचे, खोल गेले नेमके त्याच जखमा आणि सार्‍या ओळखीच्या वेदना.. तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना.. का कुठेही वेगळेसे फासलेले रंग ना ना कुणीही वेगळीशी मांडलेली भावना.. तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..! - प्राजु

वाचने 2976 वाचनखूण प्रतिक्रिया 14

प्रभो Mon, 11/23/2009 - 21:18
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! मस्तच प्राजूतै.... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा Mon, 11/23/2009 - 21:20
चांगल काव्य. एखाद कडव उचलुन/निवडुन बाकिच्यांचा अपमान नाही करणार.

मदनबाण Mon, 11/23/2009 - 21:26
मस्त... तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना.. हे कडवे विशेष आवडले... :) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo

विसोबा खेचर Tue, 11/24/2009 - 09:01
तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..!
क्या बात है! तात्या.

अवलिया Tue, 11/24/2009 - 11:17
सु रे ख ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

sneharani Tue, 11/24/2009 - 11:32
सुंदर... बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! सुंदरच..!

श्रावण मोडक Tue, 11/24/2009 - 14:26
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! मी इथेच अडकून राहिलो! सुरेख!

छान आहे कविता. वेगवेगळ्या संदर्भातही चपखल लागू पडते. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

ऋषिकेश Wed, 11/25/2009 - 10:44
मस्त... "काय त्या खाणाखूणा अन काय माझ्या कल्पना" ह्या खरे-कुलकर्णी जोडगोळीचे गाणे आठवले ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?