मिपाच्या रोजच्या खादाडी बरोबरच्या दक्षिणात्य ललना बघुन बघुन शेवटी आमच्या टाळक्यावर व्हायचा तोच परिणाम झाला.
रोज स्वप्नात या बायड्यांच्या जोडीने विविध डोसे,अप्पम, सांबार,मेदुवडे, चिकन ६५ , चिकन चेट्टीनाड, मीन करी आदी दक्षिणी पदार्थ येउ लागले.
सकाळ पर्यंत उशी लाळेने ओली होउ लागली. यावर काही तोडगा काढावा म्हणुन यातली एखदी डिश बनवुन आपणच आपल्या वाहणार्या जिभेचे नळ बंद करायचे ठरवले.
साहित्य :
सुका मसाला
१ लहान चमचा काळीमीरी
१ लहान चमचा धने
१ लहान चमचा जिरे
१ इंच दालचिनी
३-४ लाल सुक्या मिरच्या
४-५ लवंगा
१/२ वाटी सुक खोबरं
१/२ किलो चिकन. (मध्यम आकारचे तुकडे करुन)
१ मोठ्ठा कांदा (मध्यम चौकोनी) चिरुन.
१ टोमॅटो बारीक चिरुन.
२-३ कढिपत्याची पाने.
२ चमचे आल-लसुण पेस्ट.
मीठ - लाल तिखट चवी प्रमाणे.
कृती :
सर्व प्रथम तव्यावर खडा मसाला मध्यम आचेवर भाजुन घ्यावा.
सुके खोबरं पण मंद आचेवर भाजुन घ्यावे.
हे भाजलेले जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमध्ये कोरडेच (पाणी न टाकता) वाटुन घ्यावे. सुक्या खोबर्याचे थोडे तेल सुटते.
एका फ्राइंग पॅन मध्ये २ चमचे तेल तापवुन त्यात कढीपत्याची पाने टाकावीत. त्यांच तडतडण संपल्यावर त्यात कांदा टाकुन परतुन घ्यावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो टाकुन परत परतावं.
नंतर त्यात वाटलेला सुका मसाला, आल-लसणाची पेस्ट, लाल तिखट आणि चवीनुसार मिठ टाकुन चांगल परतुन घ्याव.
मसाला बाजुने तेल सोडायला लागला की त्यात चिकनचे तुकडे टाकुन नीट वर खाली करुन सगळा मसाला त्यातुकड्यांना लावुन घ्यावा.
वर झाकण ठेवुन (१०-१५ मिनिटं) मध्यम आचेवर एक दणदणीत वाफ काढावी. शक्यतो पाणी टाकु नये. चिकनच पाणी सुटतं.
तर अस हे गरमा गरम झणझणीत चिकन चेट्टीनाड आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत मिटक्या मारत खावं.
वाचने
25161
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
In reply to +१ by अवलिया
यांड खट्ट
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
चामारी
ओहोहो आहाहा
मारीटोपी
In reply to ओहोहो आहाहा by सहज
+१
नमस्कारा
पाकृ
मस्तच... शब्
+१
In reply to मस्तच... शब् by दिपाली पाटिल
क्लास!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जोरदार
च्यायला !!
छान
देवा...
...परमेश्वरा...
In reply to देवा... by श्रावण मोडक
....
In reply to ...परमेश्वरा... by बिपिन कार्यकर्ते
प्रभु.......
In reply to .... by टारझन
जबरा....
वा!!
मस्त!
चिकन
सू हा स
त्रास रे त्रास !!
१ नंबर
वा!!
मंडळ सर्व
गणपा
११@११
एक लंबर...
_/\_
शब्द
सगळ्या
तुमच्या
भूक लागली
आता बस्स
कोंबडी नक्कीच स्वर्गात गेली असणार.
खल्लास
गणप्या ... लय भारी !!
झकास पाककृती