मुक्तिदाता
लेखनविषय:
काव्यरस
अ-भाव, किर्र, काळा,
शून्य, कभिन्न, अंधार!
मनांच्या कल्लोळात,
इंद्रियांच्या अविष्कारातही
उच्चाराच्या अपेक्षेत,
उद्गाराच्या प्रतीक्षेतही
पाणावलेल्या डोळ्यांत,
उकललेल्या पापण्यांतही
विरलेल्या विस्मृतीत,
दाटलेल्या आठवणींतही
सुन्न एकटेपणात,
समुहांच्या दाट गर्दीतही,
निःशब्द रात्री,
अबोल दिवसाही
भारलेल्या जन्मकैदेत,
आभास अन् अस्तित्त्वाचा
अनासक्त मुक्तिदाता
काळाकभिन्न अंधार!
वाचने
4210
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
:)
ह्म्म्म !
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
निःशब्द रात्री,
अबोल दिवसाही
मस्त.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
In reply to निःशब्द by प्रभो
असेच म्हणतो
निःशब्द रात्री,
अबोल दिवसाही
मस्त.....
--टर्बो
एक एक दोन दोन शब्द असे येत रहातात जसे एखाद्या सिनेमाचा थिएटरमधे ट्रेलर बघताना शब्द कानावर पडत असतात.
प्रवासातल्या अंधाराचे व्याकरण समजले असेल व नोंदी करुन परिवर्तनाचे गणीत न झेपून, सारे काही अशक्य केवळ वाटत असेल तरी तुम्ही लावा लावा पणती लावा कारण तुम्हीच बनु शकता मुक्तिदाता.
!
श्रावणदिनी __/\__
काही कळाले नाही :( किंवा भवतेक मी कळुन घ्यायचा प्रयत्न केला नाही...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
श्रामो,
कविता समजुन घेण्याचा प्रयत्न केला पण नीट काही लक्षात आले नाही.
तरी कविता वाचावीशी वाटते. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
कळली आणी आवडली
कविता आवडली.
कवीला जो अपेक्षित असतो, तोच भाव रसिकांच्या ध्यानात यावा असे नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने कविता आवडू शकते.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
In reply to कविता by सन्जोप राव
कविता आवडली आणि थोडिफार समजली हि !
वरील हे वाक्य हि आवडले: "जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे"
आवर्जून दोनतीन वेळा वाचली.
अनासक्त मुक्तिदाता
काळाकभिन्न अंधार!
- छान !
काय संदर्भ घेतलेला आहे ते माहित नसल्यामुळे नाही समजली. :(
राघव
अंतराळ जाणवले, रंग नाही पण कविता आवडली.
ह्म्म्म