अमावस्या..
लेखनविषय:
काव्यरस
काळोख भयाण किरकिर रानात
रंगला आगळा खेळ
चंद्राला शोधून चांदण्या थकल्या
आलीया आवसेची वेळ
सळसळ दाटली झाडांच्या पानांत
वाराही बेभान झाला
घुमघुमं घुमघुमं कडेकपारीत
गारवा भरून गेला
चुरचुरं पाऊल रानांत चाहूल
रातीचा नूर हा न्यारा
भिरभिरं पाकोळी होऊन गोंधळी
काळोख जागवी सारा
चमचमं चमचमं चुकार काजवा
क्षणिक ठिगळ लावी
लखलख प्रकाश रेखूनी उगाच
रातीला भय तो दावी
फ़ुंकूनी तांबडं क्षितिज रंगलं
पहाट मंगल झाली
दिसेल चांदवा आजच्या रातीला
अवनी निवांत झाली
- प्राजु
वाचने
4976
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
खूप सुंदर...
चक्क अमावस्येवर कविता?
अजून पर्यंत पौर्णिमेच्याच वाचल्या ऐकल्या होत्या.
ही मस्त आहे.
मीनल.
अगदी प्राजुच्या खास लयकारीतली सुरेख कविता! नाव अवसेचं, पण पुनवेच्या चंद्रासारखी लोभस कविता!:)
क्रान्ति
अग्निसखा
सोपी सुंदर कविता.
मस्त ! आवडली कविता !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
आवडली कविता.
(स्वगतः आमावश्याच्या रात्री चकवा झाल्याने भटकत राहिलो तर त्या रात्री काय काय दिसेल, त्याचा अनुभव घेतला :) )
-दिलीप बिरुटे
(आमावश्याला घर जवळ करणारा)
अश्या कल्पनाशक्तीचे फार फार कौतुक वाटते.
:-)
फारच छान
धन्यवाद..!
सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
आवडली :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मस्त कविता प्राजु. अमावास्येवर इतकी छान कविता. कसली कल्पनाशक्ती आहे तुझी!
अमावस्येची ’चाल’ ऐका. ;)
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
|
In reply to चाल ऐका. by प्रमोद देव
फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही :)
In reply to चाल मस्त by नंदन
फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही
त्याऐवजी 'चार चाँद' लपले(लोपले) असं म्हणू या. ;)
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
मस्त ग प्राजुतै. आत्ताच वाचनात आली ही कविता.
शीSSSSSS किती सुन्दर.... भनाट कल्पनाशक्ति.
कवीता आवडली.
In reply to शीSSSSSS किती by सन्दीप
शी????? आणि सुंदर? तुमची कल्पणा(शक्ति) मात्र अंमळ मणाला भिडली
-हगवण
मस्त लयबद्ध कविता!
'हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती' ची आठण झाली. तशीच खेळकर लय आहे.
घुमघुमं वाचताना एकद संदीपचा बुंबुंबा आठवला.
तुझ्या कवितेची लयही छान आहे.
लिहिती रहा !
धन्यवाद देव काका! चाल आवडली.
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/
वा, प्राजूतै!
मस्त कविता. विषय खूपच सुंदर हाताळला आहे.
सुंदर कविता. क भयकविता म्हणू
कविता
प्राजूताई,
मी गद्य माणूस पद्यांच्या/कवितांच्या मागे कधी फारसा जात नाहीं. आताही मी आमावस्या उघडली ती तो एक 'लेख' असेल या कल्पनेनं आणि उघडली तर ती कविता निघाली आणि मग मी ती वाचलीही!
पण माझ्यासारख्या गद्य माणसालाही ही 'वृत्ता'त चोख असलेली कविता खूप आवडली. त्यातल्या त्यात "चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी, लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी" या ओळी खूपच आवडल्या.
थोडक्यात काय कीं ही कविता मी वाचणे हा एक 'गोड अपघात'च म्हटलं पाहिजे!
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
भन्नाट कल्पना आहे.
अंधा-या रात्रीला चमचमतं ठिगळ लावणारा काजवा मस्तच!
:)
खूप सुंदर...