अथांग सागर येती लाटा
सागराच्या स्पंदनाची
आगळीशी देहबोली
फेनफुले खळाळत
नभाकडे झेपावली
गतीमान जसा जसा
सागराचा श्वास होई
ऊर त्याचा फेसाळत
खाली वर झेप घेई
भावनांच्या आवेगाने
क्षणक्षण उचंबळे
थरथरले वाळूचे
कण कण इवलाले
नभातल्या चंद्रामुळे
खुळी चांदणी जाहली
मिठीमध्ये किनाऱ्याच्या
फेनफुले विसावली
एकामागे एक येते
खळाळत लाट लाट
लपाछपीमध्ये होते
दिनरात नि पहाट
थांग लागेना अजुनी
माणसाला मानसाचा
मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!
वाचने
10874
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख..!
छान कविता
सागराच्या
खरंय....!
जियो !!!!
हेच म्हणतो.
In reply to जियो !!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
परफेक्ट
In reply to हेच म्हणतो. by चतुरंग
असेच
In reply to जियो !!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
५/३
In reply to असेच by धनंजय
'ह्या' म्हणजे कुठल्या?
In reply to असेच by धनंजय
धन्यवाद
वाव्वा!
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख!
सुंदर
सागराची देहबोली ,......
सुवर्णमयी,
अप्रतीम!