मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोध ....!

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अंधाराच्या साम्राज्यावर दिवटीचा तोरा सुर्य उभा कोपर्‍यात काजवे करताहेत नखरा क्षितीजावर उभे प्रकाशाचे दुत पण आसमंत सारा सावल्यांनी झाकोळलेला मी कुणाला विचारु सुखाचा रस्ता इथे प्रत्येक जण वेदनेने पिळवटलेला कधीचा शोधतोय मी नेहेमीच गोंधळलेला अंधाराच्या दुनियेत प्रकाशालाच अडखळलेला. विशाल

वाचने 3473 वाचनखूण प्रतिक्रिया 9

प्राजु Fri, 09/18/2009 - 18:59
सुरेख शेवट!!! आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/