मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..युरेका युरेका..

कानडाऊ योगेशु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
युरेका युरेका --------------------------------------------------- अता युद्ध होईल नक्की निकाली, युरेका युरेका.. उरलीत शस्त्रे तुटल्यात ढाली, युरेका युरेका.. मला पाहुनी ती अशी लाजली की तुम्हा काय सांगू.. अभंगातुनी मज स्फुरली कवाली, युरेका युरेका.. तिचे सज्जनांशी होतेच तंटे कळता मला अन.. जमले मला ते बनणे मवाली, युरेका युरेका.. नवे दु:ख येता निवार्यास माझ्या म्हणालो स्वतःशी.. सुन्या जिंदगानीत नवी जान आली, युरेका युरेका.. जुन्या त्या लढ्याला हुतात्मा मिळाला अखेरीस कोणी.. चला क्रांतीला ह्या सुरवात झाली युरेका युरेका.. तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी.. पुरी जिंदगानीच अख्खी बुडाली, युरेका युरेका.. जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. ------------------------------------------------ - योगेशु(बंगळूरु)

वाचने 2518 वाचनखूण प्रतिक्रिया 9

क्रान्ति गुरुवार, 09/17/2009 - 18:40
जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. वा! खूपच सही! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मदनबाण गुरुवार, 09/17/2009 - 18:44
मस्तच... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

हृषीकेश पतकी गुरुवार, 09/17/2009 - 20:18
जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. खूप मस्त !!!! आपला हृषी !!

प्राजु गुरुवार, 09/17/2009 - 21:07
तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी.. पुरी जिंदगानीच अख्खी बुडाली, युरेका युरेका.. सह्ही!! आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अनिल हटेला गुरुवार, 09/17/2009 - 21:52
तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी.. पुरी जिंदगानीच अख्खी बुडाली, युरेका युरेका.. :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

बेसनलाडू Fri, 09/18/2009 - 22:08
संमिश्र भावनांची कविता आवडली. जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. फार छान! (मुक्त)बेसनलाडू