सखा श्रावण
लेखनविषय:
सखा श्रावण
नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा
इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला
हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी
पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी
खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा
खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा
आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला
हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला
गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं
गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं
नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला
फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला
-चंद्रप्रभा
(येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)
वाचने
16927
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
कविता आवडली
In reply to कविता आवडली by प्रियाली
धन्यवाद
छान कविता..
In reply to छान कविता.. by विसोबा खेचर
धन्यवाद
छानच खेळ
In reply to छानच खेळ by धनंजय
धन्यवाद
छान आहे
धन्यवाद
@आला आला
अतिश्य सुरेख...
सुरेख !!
खूप छान कविता...
माझ्या मुलाच्या मदतीने !!!!!
सुन्दर कविता
छान कविता
अत्यंत छान, साधे, सोपे शब्द आणि गेय रचना.
खूपच छान
सुस्वागतम ..........
श्रावण