अलीकडचे "चिडके बिब्बे" ऑस्ट्रेलियन खेळाडू
लेखनप्रकार
हे माझे पहिले-वहिले लेखन आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे!
================================================
क्रिकेटची गोडी मला लागली १९६० पासून. त्यावेळी इंग्लंडचे कप्तान होते लेन हटन व नंतर पीटर मे, ऑस्ट्रेलियाचे होते हॅसेट् व रिची बेनो, पाकिस्तानचा करदार, वेस्ट इंडीजचे वॉरेल वगैरे. भारताचे कप्तान सारखे बदलायचे, कधी पॉली उम्रीगर, कधी बुधी रामचंद कधी अमरनाथ वगैरे. आपण क्वचितच जिंकत असू, त्यामुळे भारताच्या विजयाची अशी मनात जिद्द वाटायची नाहीं, पण ऍशेस् सीरीजकडे मात्र खूप लक्ष असायचं. इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं म्हणून असेल, पण ऍशेस् सीरीजबाबत ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकावी असे मनोमनी वाटायचे. डॉन ब्रॅडमनचे फक्त नाव ऐकलेले. रिची बेनोपासून क्रिकेटचा भक्त! नंतर बॉबी सिंप्सन, बिल लॉरी, आयन व ग्रेग चॅपेल, किम ह्यूज, ऍलन बोर्डर, मार्क टेलर, स्टीव वॉ व आता रिकी पॉंटिंग असे ऑस्ट्रेलियाचे अनेक कप्तान आले व गेले, पण ऑस्ट्रेलियाबद्दलची ही आपुलकी अलीकडेपर्यंत कधी कमी झाली नव्हती. ऑस्ट्रेलियाचे कप्तान व खेळाडू नेहमीच विजिगीषुवृत्तीने खेळायचे पण खिलाडू वृत्तीत कमी नाही.
पाकिस्तानात खेळताना ब्रॅडमनचे रेकॉर्ड मोडायची संधी असताना सामना जिंकायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून ३३४ धावावर नाबाद असलेल्या टेलरने डाव आदल्या दिवशीच्याच धावसंख्येवर घोषित केला होता ही घटना ऑस्ट्रेलियन कप्तानांच्या मनाची सकारात्मक घडण दाखविणारी उत्तम घटना म्हणता येईल.
स्टीव वॉ आल्यापासून मात्र हे चित्र बदलले. हळू-हळू ऑस्ट्रेलियन कप्तान व खेळाडू नुसते विजिगीषु वृत्तीनेच न खेळता चिडके बिब्बे झाले व "विजयासाठी कांहींही" या वृत्तीने खेळू लागले व तेंव्हापासून त्यांचा संघ माझ्या मनातून उतरू लागला. रिकी पॉंटिंगचं वागणं तर ज्याला "वाह्यात" म्हणता येईल असं होऊ लागलं. जसा कप्तान तसा संघ या न्यायाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची खिलाडूवृत्ती टप्प्या-टप्प्याने दिसेनाशी झाली! स्टीव वॉच्या काळापासून आपला संघ कधी-कधी जिंकूही लागला होता व त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच असभ्य वर्तन जास्तच जाणवू लागलं. त्यात स्लेजिंग या सोज्वळ नावाखाली केलेले असभ्य वर्तन तर आणखीच जाणवू लागले.
या असभ्य वर्तनाची परमावधी झाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुंबईतल्या ब्रेबर्न स्टेडियमवरील बक्षिस समारंभात! त्यावेळी पॉंटिंग, ब्रेट ली, ऍन्ड्र्यू सायमंड्स् व इतर खेळाडूंनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ भारतीय नेत्याचा माकडचेष्टा करून अपमान केला ते पाहून तर मन विटून गेलं. त्यात हरभजन सिंगवर केलेले खोटे आरोप (ज्यातून तो दोषमुक्त होऊन बाहेर पडला), पंचांना घाबरवून वेडेवाकडे निर्णय द्यायला भाग पाडून जिंकलेली टेस्ट् अशा अनेक घटना मनात गर्दी करतात.
परिणाम एवढाच कीं नुकतीच संपलेली ऍशेस् सीरीज इंग्लंडने जिंकली याचा अतीशय आनंद झाला.
वाचने
2313
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
माकडचेष्ट
सहमत की असहमत?
परिणाम
१०० टक्के सहमत!
पवारान्चा अपमान कधीही होत नसतो
खरे आहे
बरोबर!