कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !!
-- कवी शाहरुख
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7375
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट
थोडासा
हाहा
In reply to थोडासा by Nile
मस्त कविता..
लै भारी!
लई भारी रे शाहरुख!
मस्त
एकदम झ्याक
मस्त लिहले
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
हा हा
+१
In reply to हा हा by सहज
+२
In reply to +१ by छोटा डॉन
लैच भारी...
निम्म्यां
झक्कास...
हाय काय
तिच्यायला
मस्त !
बेष्ट कविता...
माय नेम इज खान !
येकदम ब्येस . .
तिच्यायला... लै भारी!
काहो?
नाही हो..
In reply to काहो? by श्रावण मोडक
लै भारी..
मस्त आहे
शारुखभाऊ
हॅ हॅ !!
झकास
आल्या आल्या नवी मंडली एकठोक
मस्तच... आमचीच जणू
झकास कविता शाहरुख !
शारुक लय आवडतो वाट्टं????
In reply to झकास कविता शाहरुख ! by वाहीदा
इतका का एमोशनल होतो आहेस भाऊ ?
In reply to शारुक लय आवडतो वाट्टं???? by प्यारे१