साला आपल्याला कोण संस्कृत शिकवायला तैय्यार नाय. आजपत्तुर जे तज्ञ भेटले ते सौताला लै शाणे समजणारे. त्यांचं-आपलं काय जमेना! ते फक्त संस्कृतची ट्यँव ट्यँव करतात पण साध्यासोप्या रितीनं शिकवा म्हटलं तर एक जण तैय्यार नाय!
पण साला आपल्याला पण शिकायची लै हौस. मग लास्टमदी आपण आंतरजालावर काही संस्थ़ळं शोधली आणि आपली आपण काही वाक्य तैय्यार केली. मिपावरील धनंजयादि संस्कृत तज्ञांनी ती तपासावी अन् काय बरोबर, काय चूक ते सांगावं... हां, सुरवातीला सर्व काय चुकेल, पण फिकर नाय! नाकातोंडात पाणी गेल्याबिगर पोहता येत नाय अन् ढोपरं फुटल्याबिगर सायकल शिकता येत नाय यावर आपला भरौसा हाय! :)
आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो की लागलो. मंग माघार नाय! तात्या अभ्यंकर म्हनतात आपल्याला!
भास्करचा भास्करबुवा होईन तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवीन असं आमचे भास्करबुवा एकदा सौताला लै शाणा समजणार्या एकाला बोल्ले होते. त्याच चालीवर आपण पण बोलतो -
"तात्याचा 'तात्याशास्त्री' होईन तेव्हाच दम खाईन!" :)
आपण मदत घेत असलेली संस्थळं -
http://www.sanskritdeepika.org/
http://spokensanskrit.de/
इतरही काही संस्थळे असल्यास कळवा -
आधी वरजिनल मराठी वाक्य अन् मग आपण केलेलं भाषांतर -
१) तात्या संस्कृत शिकतो.
"तात्या गीर्वाण भाषा पठति"
२) तात्याने आंबा खाल्ला.
"तात्या आम्रफल अखादत्"
की,
"तात्या आम्रफलं अखादत्" ? (तसे असल्यास 'ल'वर अनुस्वार का द्यायचा?)
३) तात्या आळशी आहे.
"तात्या कार्यहीन:"
४) तात्या लिहीत आहे.
"तात्या लेखन वर्तते"
५) तात्या मरेल.
"तात्या मृतश्यति"
ओक्के..
अरे चूक का बरोबर ते कुणीतरी सांगा रे. चुकल तर काय चुकलं ते पण सांगा...
आपला,
(विद्यार्थी) तात्या.
सूचना - येथे फक्त विषयाला अनुसरूनच चर्चा होईल. अवांतर प्रतिसाद त्वरीत उडवले जातील. त्याकरता खरडवह्या वापराव्या.
वाचने
19014
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकच बोलतो..
लोच्या
तात्यामहो
In reply to लोच्या by सुनील
आकारांत पुंल्लिंगी संस्कृत शब्द आहेत
In reply to लोच्या by सुनील
'तात्या'
In reply to आकारांत पुंल्लिंगी संस्कृत शब्द आहेत by धनंजय
तात्या
ज्यीतिष्मत्
ह्मम्म्म..
आता हे
In reply to ह्मम्म्म.. by विंजिनेर
ठिकाय मग
In reply to आता हे by विसोबा खेचर
आलसस्य...
In reply to ठिकाय मग by विंजिनेर
माझ्या मते...
In reply to ठिकाय मग by विंजिनेर
५) तात्या
In reply to ठिकाय मग by विंजिनेर
सुरवात
सातवीत शिकलेले संस्कृत आठवायचा प्रयत्न करतेय
होय, शेवटचे वाक्य
In reply to सातवीत शिकलेले संस्कृत आठवायचा प्रयत्न करतेय by लवंगी
>>सामान्यतः
In reply to होय, शेवटचे वाक्य by धनंजय
स्तोत्र
तात्या
अट मजेमजेत पण सुचवण्या
वा!
चला.. या
छान माहिती
विशेषनामे वगळता काही यौगिक शब्द "विश्वपा", "शंखध्मा" वगैरे
In reply to छान माहिती by सुनील
धन्यवाद
In reply to विशेषनामे वगळता काही यौगिक शब्द "विश्वपा", "शंखध्मा" वगैरे by धनंजय
, पूर्वी
In reply to धन्यवाद by सुनील
आकाशवाणी
In reply to , पूर्वी by विंजिनेर
वा वा
In reply to आकाशवाणी by ब्रिटिश टिंग्या
प्रचलित
In reply to धन्यवाद by सुनील
उत्तम विवेचन
In reply to प्रचलित by धनंजय
म्हणी
In reply to उत्तम विवेचन by सुनील
राजा हा
In reply to छान माहिती by सुनील
तात्या यु टू.... २००८ मधली शिकवणी विसरलात की काय :-)
यद्
आजचा
१.
In reply to आजचा by JAGOMOHANPYARE
असे म्हणतात...
कैच्या कैच!!
In reply to असे म्हणतात... by विकास
तात्या शास्त्री